
सावंतवाडी : कोलगाव येथील श्री देवी सातेरीच्या पडली उत्सवाला भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी भेट देत दर्शन घेतले.यावेळी विशाल परब यांच्या मनातील सर्व राजकीय,व्यावसायिक व इतर सर्व इच्छा आणी कामना पूर्ण होवूदेत अशा पद्धतीचे साकडे या देवस्थानचे मानकरी चंदन धुरी यावेळी देवीला घातले.
यावेळी विशाल परब यांनी श्री देवी सातेरी पाडली उत्सवाचे दर्शन घेतले आणी ते नतमस्तक झाले.सध्या कोलगांव येथील प्रसिद्ध पडली उत्सव सुरू झाला आहे.आज या उत्सवानिमित्त विशाल परब हे या पडली उत्सवाला भेट घेण्यासाठी दाखल झाले होते.यावेळी त्यांचा देवस्थान कमिटीच्या वतीने श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आपले पूर्ण सहकार्य या देवस्थान कमिटीला भविष्यात राहणार आहे .मला कधीही हाक मारा.मी कधीही तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे.असे आश्वासन विशाल परब यांनी यावेळी दिले. यावेळी आनकरी चंदन धुरी,विरेंद्र धुरी,रामदास बावकर,अशोक धुरी यासह ग्रामस्थ उपस्थित होते.