
सावंतवाडी : मी सर्वसामान्यांसाठी काम करणारा व्यक्ती आहे. 2009 पासून मी सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहे. त्यामुळे पक्षाला जर विधानसभेसाठी मी योग्य उमेदवार आहे असं वाटल तर पक्ष निर्णय घेईल, कोण बाहेरचा व कोण स्थानिक दुय्यम आहे. मी एक भारताचा नागरिक आहे. शिवाय सावंतवाडी मतदारसंघ हा पूर्वी माणगाव खोऱ्यालाच जोडला होता. त्यामुळे मी कोणाच्या टीकेला उत्तर देणार नाही अशी स्पष्ट भूमिका भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी मांडली.
राजन तेली आपली भूमिका मांडतायत त्यावर मी बोलणं योग्य नाही. ते मोठे नेते आहेत. तर संजू परब जरी माझ्यावर बाहेरचा म्हणून बोलत असले तरी ते माझे मोठे भाऊ आहेत. त्यामुळे मी त्या दोघांवर बोलणं योग्य वाटत नाही असेही श्री. परब यावेळी म्हणाले. निरंजन डावखरेबाबत पदवीधर मतदारांना भेटत नसल्याने काहीशी नाराज होती ही गोष्ट खरी आहे. त्यामुळे आम्ही सुद्धा त्यांना ती गोष्ट सांगितली असून ती नक्की येणाऱ्या काळात आम्ही सुधारून जे काय प्रलंबित प्रश्न असतील ते मार्गे लावण्यासाठी आम्ही निश्चितच सर्व भारतीय जनता पार्टी म्हणून प्रयत्न करू असं विश्वास भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी येथे व्यक्त केला. यावेळी माजी उपनगराध्यक्ष उमाकांत वारंग, माजी सभापती सुधीर आडीवरेकर, दिलीप भालेकर, केतन आजगावकर आदी उपस्थित होते.