रेडकर कुटुंबीयांची विशाल परब यांनी केली विचारपूस | घटनास्थळी दिली भेट

Edited by: भरत केसरकर
Published on: March 21, 2024 07:26 AM
views 605  views

कुडाळ : काल मध्यरात्री दोनच्या सुमारास तळवडेचे माजी सरपंच कृष्णाजी पांडुरंग रेडकर यांच्या घरासमोरील शेडला अचानक आग लागली. काही किरकोळ नुकसान झाले होते. तळवडे येथील क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेल्या युवा उद्योजक विशाल परब यांनी ही घटना समजताच घटनास्थळी भेट दिली.  

विशेष म्हणजे यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परब यांनी  त्यांना आधार देत आपुलकीचा संवाद साधला. अशा घटनांमध्ये आपण समाजातील एक घटक या नात्याने त्यांना आधार देण्याचा प्रामाणिक प्रयत्न माझ्या परीने केला. असेही विशाल परब यावेळी म्हणाले.