
कुडाळ : भाजपचे युवा नेते,युवा उद्योजक, विशाल सेवा फाउंडेशन चे अध्यक्ष तथा हिंद मराठा महासंघाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष विशाल परब यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांची भेट घेतली. ह्या भेटीत विशाल परब यांनी सौरभकुमार अग्रवाल यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांचे स्वागत करत त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी विशाल परब व सौरभकुमार अग्रवाल यांच्यात विविध विषयावर सुमारे अर्धा तास चर्चा झाली. सिंधुदुर्ग जिल्हा भौगोलिक दृष्टिकोनातून नंबर वन आहे. जिल्हा आपल्याला खरच आवडला असल्याचे सौरभकुमार अग्रवाल यांनी सांगितले. तर पर्यटन दृष्टिकोनातून ह्या जिल्ह्याचा मोठ्या प्रमाणात विकास होवू शकतो. असेही सौरभकुमार अग्रवाल यांनी सांगितले.
विशाल सेवा फाउंडेशन व हिंद मराठा महासंघ च्या वतीने सिंधुदुर्गसह देशभरात सुरू असलेल्या विविध क्षेत्रातील उपक्रमांची माहिती विशाल परब यांनी सौरभकुमार अग्रवाल यांना दिली. या भेटीनंतर आपल्याला शुभेच्छा दिल्याबद्दल सौरभकुमार अग्रवाल यांनी विशाल परब यांना खूप धन्यवाद दिले आहेत.