मंत्री राणेंची वाढदिनी विशाल परब यांनी घेतली सदिच्छा भेट...!

Edited by: भरत केसरकर
Published on: April 10, 2024 06:36 AM
views 168  views

सिंधुदुर्ग : मार्गदर्शक, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांची कणकवलीतील निवासस्थानी सदिच्छा भेट घेत शुभेच्छा दिल्या. तसेच वाढदिवस अभिष्टचिंतन करून आशीर्वाद घेतली असल्याची प्रतिकीया भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी दिली आहे. विशाल परब म्हणाले आपल्याला सामाजिक, राजकीय अशा विविध क्षेत्रात राणे साहेबांचे कायमच मोलाचे मार्गदर्शन लाभत असते. त्यांना उत्तम, निरोगी, दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा याप्रसंगी व्यक्त करत आहे.माझ्या राजकीय गुरूंना उत्तम व चांगले आरोग्य लाभो अशी आपण परमेश्वराकडे प्रार्थना करत असल्याचे विशाल परब यांनी म्हटले आहे.यावेळी जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये,प्रथमेश कामत,प्रशांत पाटील,  ओकार पावसकर, नयन गुरव,प्रसन्ना गंगावणे,केतन आजगावकर, तेजस माने,चेतन जगदाळे आदी उपस्थित होते.