
सावंतवाडी : भाजपचे युवा नेते तथा युवा उद्योजक विशाल परब यांनी आपल्या जीवनात दातृत्वाचे काम केले आहे.विशाल तू जनसामान्यांची सेवा करत रहा तुला जीवनात कधीच काही कमी पडणार नाही.गोर गरीब जनतेची सेवा करताना भविष्यात विशाल तुझी अशी राजकीय भरभराट होईल की त्याचा तू विचार पण केला नसशील. भविष्यात या कोकणच नेतृत्व करताना विशाल तुला बघायच आहे.तुझ्या नावातच विशाल आहे. त्यामुळे विशाल,तु सुरू केलेल्या विशाल सेवा फांउडेशनच्या माध्यमातून अशाच प्रकारची जनसेवा सुरू ठेव. तुझ्या कार्याचा नक्कीच सन्मान होईल. असे गौरवोद्गार विशाल परब यांच्याबाबतीत माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी काढले.श्री.शांताराम प्रभू झांट्ये ट्रस्ट अनुदानित व रेडकर रिसर्च सेंटर ट्रस्ट संचलित विसावा या नविन संकल्पनेचा शुभारंभ सुरेश प्रभू यांच्या हस्ते झाला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणूनविशाल सेवा फाउंडेशनचे अध्यक्षतथा युवा उद्योजकतथा भाजपचे नेते विशाल परब हे व्यासपीठावर उपस्थित होते.
रेडकर हाॅस्पीटल रिसर्च सेंटरच्या १७ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून हा सोहळा संपन्न झाला.या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते झाले.तर उद्योजक तथा भाजपचे युवा नेते विशाल परब हे उपस्थित होते.विशाल सारख्या उमद्या कार्यकर्त्याची वाटचाल डोळ्यासमोर ठेवून युवा पिढीने आपली वाटचाल सुरू ठेवली पाहिजे.असे प्रभू म्हणाले.रेडकर हॉस्पिटल संचलित विसावा या केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी श्री. प्रभू बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर मानव साधन शिक्षण संस्थेच्या चेअरमन सौ.उमा प्रभू,गोव्याचे आमदार डॉक्टर चंद्रकांत शेट्ये,रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर ट्रस्ट चे अध्यक्ष डाॅ विवेक रेडकर,शांताराम प्रभू झांट्ये ट्रस्ट अध्यक्ष सुरेश झांट्ये हे उपस्थित होते.तसेच रेडकर हॉस्पिटल व रिसर्च सेंटर , रेडी येथील ह्या कार्यक्रमास भाजपचे युवा नेते तथा युवा उद्योजक,विशाल सेवा फाउंडेशन चे अध्यक्ष विशाल परब यांनी शुभेच्छा दिल्या.ह्या भव्य दिव्य सोहळयात विशाल परब या युवा नेतृत्वाचा सत्कार करण्यात आला.