विशाल परब हा 'अलिबाबा'

केसरकरांनी केलेल्या कामांचे देतोय शब्द : संजू परब
Edited by:
Published on: November 08, 2024 19:14 PM
views 799  views

सावंतवाडी : माणगाव खोऱ्यातील महाठग शेगडी निशाणी घेऊन उभे राहिलेत. 'अलिबाग चाळीस चोर' मधील विशाल परब हा अलिबाबा आहे. दीपक केसरकर यांनी मंजूर केलेली व ज्या कामांची टेंडर निघालीत अशी कामं करणार असल्याच्या पोस्ट पगारी नोकर असणाऱ्या कार्यकर्त्यांकडून काही पोस्ट ते व्हायरल करत आहेत. हा खोटारडा माणूस असून पाच नंबर त्यांचा आहे तो पाच नंबरलाच फेकला जाणार असा जोरदार हल्लाबोल शिवसेना संघटक संजू परब यांनी केला. सावंतवाडी येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

श्री. परब म्हणाले, माणगाव खोऱ्यातील महाठग शेगडी निशाणी घेऊन उभे राहिले आहेत. त्यांची लॅंडमाफीया अशी ओळख आहे. पगारी नोकर असणाऱ्या कार्यकर्त्यांकडून काही पोस्ट ते व्हायरल करत आहेत. गावात ग्रामपंचायतीला उभा न राहीलेला माणूस जनतेला मोठमोठे शब्द देत आहे. मात्र, दीपक केसरकर यांनी ही काम आधीच मार्गी लावली आहेत. मंत्री केसरकर यांनी मंजुर करून आणलेल्या गोष्टींची खोटी आश्वासने हा माणूस देत आहे. या कामांची टेंडर देखील निघालेली आहेत. विशाल परब हा खोटारडा माणूस असून पाच नंबरलाच तो फेकला जाणारा आहे. अलिबाग चाळीस चोर मधला हा अलिबाबा आहे. मोती तलाव येथील फाउंटनची वर्क ऑर्डर निघालेली असताना आपण ते करणार असल्याचे तो भासवत आहे. मल्टीस्पेशालिटीबाबतही आपण ते करणार असं बोलत आहे. जी काम आधीच झालेली आहेत. महायुती सरकारच्या काळात ज्याची टेंडर निघाली आहेत अशी काम आपण करणार असं हा माणूस सांगत आहे. केसरकर यांनी आधीच केलेली काम आपण करणार असं तो सांगत आहेत अशी टीका संजू परब यांनी केली.

तसेच १३ ते १९ नोव्हेंबर पर्यंत राजन तेली व विशाल परब यांचे कारनामे मी बाहेर काढणार आहे असा इशाराही दिला.‌ तर विशाल परब सोबत दोस्ती होती. मात्र, अलिबाबा चोरांसोबत गेल्यानंतर मी त्याची दोस्ती तोडली. त्यानंतर मी त्यांच्यासोबत दिसलो नाही. त्यांच्या पदाला आमची शिफारस नव्हती. त्यांच्या पद्धतीला‌ भाजपमध्ये असताना मी आणि महेश सारंग यांनी विरोध केला. असही श्री. परब यांनी म्हणाले. मल्टीस्पेशालिटीबाबत केसरकर यांनी काही गोष्टी सांगितल्या. हे हॉस्पिटल सावंतवाडीत होण आवश्यक आहे‌. त्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय असल्याने त्याचा फायदा होईल.‌ आचारसंहिता उठली की कामाला सुरुवात होईल अशी माहिती त्यांनी दिली.

केसरकरांच्या विजयाची पैज !

दरम्यान, महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांचा विजय निश्चित आहे. 70 हजारच्या दीपक केसरकर मते घेणार आहेत. तर उर्वरित ८० हजार मते तिघांत विभागली जाणार असल्याचा दावा संजू परब यांनी केला. तशी पैजही त्यांनी मारली. यावेळी युवासेनेचे सुरज परब उपस्थित होते.