विशाल परब हे 'स्पार्कींग मॅन'...100 टक्के खासदार किंवा आमदार होणारच !

आमदार जीत आरोलकर यांच्या या शब्दांनी झाला टाळ्यांचा अखंड गजर !
Edited by: भरत केसरकर
Published on: October 12, 2022 22:02 PM
views 308  views

वेंगुर्ले : विशाल परब याच्या मध्ये तेज आहे. म्हणून मी त्याला आजच नाव देतो की "स्पार्कींग मॅन". भविष्यात मी अभिमानाने सांगतो की विशाल परब हे शंभर टक्के खासदार किंवा आमदार होणारच. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. विशाल मी तुला शब्द देतो की वेंगुर्ल्या तालुक्याच्या शेजारी माझा मतदार संघ आहे. येथील मुल जी कामाला येतात त्यांना कुठलीच अडचण मी येवू देणार नाही. विशाल परब यांच्यासारखा मला दिलदार मित्र लाभला याचे मी भाग्य समजतो. विशाल परब यांनी जे जीवनात कमी कालावधीत कमवले आणि यश मिळवल ते साधे नाही. त्यासाठी जिद्द आणि मेहनत आहे. खरोखरच मी  विशालला मी वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देत असल्याचे अध्यक्ष स्थानावरून बोलताना मांद्रे विधानसभा मतदार संघाचे आमदार जीत आरोलकर यांनी सांगितल. ते "विशाल श्री" शरीर सौष्ठव स्पर्धेत उद्घाटन प्रसंगी वेंगुले येथील कै.मधुसुदन कालेलकर सभागृहातून बोलत होते.