विशाल परब यांनी 'विशाल सेवा फाउंडेशन'ची केली घोषणा !

विशाल परब यांनी केली घोषणा !
Edited by: प्रतिनिधी
Published on: October 22, 2022 20:50 PM
views 407  views

सावंतवाडी : गेली १५ वर्षे विशाल परब मित्रमंडळाच्या माध्यमातून सामाजिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रम केले जात असून या मित्रमंडळाच रूपांतर हे 'विशाल सेवा फाउंडेशन'मध्ये करत आहोत. या फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य क्षेत्रात कार्य केलं जाणार अशी माहिती संस्थापक विशाल परब यांनी दिली. 


ते म्हणाले, गेली पंधरा वर्षे विशाल परब मित्र मंडळ सिंधुदुर्गच्या माध्यमातून समाज उपयोगी उपक्रम घेत आलो आहे. सामाजिक कला क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात विविध उपक्रम विशाल परब मित्र मंडळ गेली अनेक वर्ष घेत आहेत. मी ह्या समाजाच काहीतरी देणं लागतो. या भावनेतून निस्वार्थीपणे काम निरंतर पढे करत आलो आहे. त्याचाच एक भाग म्हणून विशाल सेवा फाउंडेशन आपल्या सेवेत घेऊन येत आहोत. विशाल सेवा फाउंडेशनची मुख्य उद्दिष्टे शेती, शिक्षण, आरोग्य, नोकरी, उद्योग, खेळ,पर्यटन व पर्यावरण या क्षेत्रात विविध उपक्रम चालू करावयाचे आहेत. कोकणचा सर्वांगीण विकास हे या फाउंडेशनचे मुख्य उद्दिष्ट असेल.

मी गेल्या काही वर्षात जे उपक्रम राबवले ते तुमच्याच माध्यमातून राबविले आहेत, असे सांगून ते म्हणाले, आरोग्य क्षेत्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी आरोग्य शिबीर घेवून मी चष्मा वाटप केला. वाडोस येथील कार्यक्रमात ॲम्बुलन्स वितरण केली. याचा फायदा अनेकांना झाला. सांस्कृतिक क्षेत्रात विविध मनोरंजन कार्यक्रम घेतले.तर क्रीडा क्षेत्रात कबड्डी, क्रिकेट, व्हॉलीबॉल सारख्या मोठ-मोठ्या कार्यक्रमांचा आयोजन विशाल परब मित्र मंडळ द्वारे करण्यात आले. विशाल परब मित्रमंडळाचे मुख्य उद्दिष्ट नेहमी हेच राहिले आहे की समाजातील कानाकोपऱ्यापर्यंत आपली सेवा निस्वार्थी भावनेने पोहोचवणे हेच आहे.यासाठी मी झटत आलोय.sawantwadiसिंधुदुर्ग जिल्ह्यात वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प विशाल सेवा फाउंडेशन लवकरच घेऊन येत आहे.सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन दृष्टिकोनातून महत्वपूर्ण मानला जातो. यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वात मोठा मत्स्य महोत्सव मी लवकरच वेंगुर्ल्यातील समुद्र किनार्‍यावर घेणार आहे.यात लाखो लोकांचा सहभाग अपेक्षित असणार आहे.पर्यटनदृष्ट्या आरवलीचे पंचतारांकित हॉटेल्स लवकरच सुरू व्हावे यासाठी पाठपुरावा करणार आहे.

     सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारा जवळचा घाट म्हणजे आंजीवडे घाट. हा घाट कित्येक वर्ष प्रलंबित आहे. हा घाट मार्ग जोडल्यास झाराप व आकेरी ते कोल्हापूर अंतर शंभर किलोमीटरवर येणार आहे. तब्बल 60 ते 70 किलोमीटर अंतर वाचणार आहे.त्यामुळे माझा पहिला मानस असणार आहे की अंजिवडा घाट पूर्ण व्हावा. यासाठी मी आणि माझं फाउंडेशन सातत्याने काम करत राहणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा अजून एका बाबतीत पुढे यावा म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेड्या गावांचा विकास व्हावा हा माझा मानस असणार आहे.विशेषता माणगाव खोरे नंबर वन बनवण्यामध्ये माझं फाउंडेशन काम करणार आहे. अनेक शेतकरी आज बेकार आहेत. या बेकार शेतकऱ्यांना मदत देण्याचे देण्याचा संकल्प माझा आहे. यासाठी माणगाव खोऱ्यात वेंकीज सारखी कंपनी आणण्याचा मी प्रयत्न करतोय. यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. या धर्तीवर माझा फाउंडेशन काम करतोय. दिवाळीच्या पूर्वसंध्येला आज मी घोषणा करतोय याचा आनंद होत असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक गोरगरीब माणसाला व  सर्वसामान्य लोकांपर्यंत "विशाल सेवा फाउंडेशन" हे कार्यरत राहणार असून हे तुमच्यासाठीच असेल, असं मत संस्थापक विशाल परब यांनी व्यक्त केले.

यावेळी दादा साईल, कुडाळ माजी नगराध्यक्ष विनायक राणे, प्रसन्न देसाई आदी विशाल सेवा फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते