विशाल फाऊंडेशन कायम पत्रकारांच्या पाठीशी : विशाल परब

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई, सिंधुदुर्ग संलग्न इलेक्ट्रॉनिक्स मीडिया मराठी पत्रकार संघाचा पुरस्कार सोहळा उत्साहात !
Edited by: विनायक गांवस
Published on: March 08, 2023 15:47 PM
views 126  views

सावंतवाडी : मला आज अभिमान वाटतो की सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज शहरातील पत्रकार कमी असले तरी खेड्यातील पत्रकार मात्र जास्त आहेत. लोकसंख्या जरी कमी दिसली तरी आमच्या लोकांमध्ये वेगळं कौशल्य आहे. एक पत्रकार काय करू शकतो त्याची ताकद आम्हाला माहिती आहे,“तुम्ही मला केव्हाही हाक मारा विशाल फाऊंडेशन कायम तुमच्या पत्रकारांच्या पाठीशी असेल ”असे प्रतिपादन भाजप युवा नेते तथा उद्योजक विशाल परब यांनी बांदा येथील आनंदी मंगल कार्यालय येथे आयोजित महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई, सिंधुदुर्ग संलग्न इलेक्ट्रॉनिक्स मीडिया मराठी पत्रकार संघाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात आयोजित केलेल्या पत्रकार पुरस्कार वितरण कार्यक्रमात व्यासपीठावरून बोलताना काढले. 


यावेळी व्यासपीठावर श्री श्री १०८ महंत मठाधीश प.पू.सद्गुरू गावडे काका महाराज, उद्योजक विशाल परब, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष आबा खवणेकर, सेवानिवृत्त कॅप्टन शंकर भाईप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभागीय अध्यक्षा सौ. अर्चना घारे-परब, बांदा सरपंच सौ. प्रियांका नाईक, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई सरचिटणीस विश्वासराव आरोटे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ. कोकण विभाग संपर्क प्रमुख बाजीराव फराकटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पश्चिम मुंबई जिल्हाध्यक्ष रमेश परब, माजी शिवसेना महिला तालुकाप्रमुख अपर्णा कोठावळे, बांदा वैद्यकीय अधिकारी डाॅ.जगदीश पाटील, राष्ट्रवादीचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ गोवा संपर्क प्रमुख शिवाजी नेहे, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन जिल्हा सरचिटणीस राकेश केसरकर आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.


यावेळी प.पू.सद्गुरू गावडे काका महाराज यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस युवा उद्योजक विशाल परब यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला. तर शिवाजी महाराज यांच्याही प्रतिमेस प.पू.काका गावडे महाराज यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला.


यावेळी विशेष प्राविण्य यश मिळविणारी कु. समिका चिपकर, सुचिता कांडरकर,विराज परब, किरण देसाई, गजानन गाड, गौरवी पेडणेकर, तेजस माने, तर नवनिर्वाचित बांदा सरपंच सौ. प्रियांका नाईक,कास सरपंच प्रविण पंडीत, निगुडे सरपंच लक्ष्मण निगुडकर, शेर्ले सरपंच प्रांजल जाधव या सर्वाचा उद्योजक विशाल परब, प.पू.काका गावडे महाराज, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष आबा खवणेकर, सेवानिवृत्त कॅप्टन शंकर भाईप, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई सरचिटणीस विश्वासराव आरोटे,राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभागीय अध्यक्षा सौ.अर्चना घारे-परब या सर्वाच्या हस्ते शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सर्वाचा सत्कार करण्यात आला.


यावेळी व्यासपीठावरून बोलताना विशाल परब पुढे म्हणाले की, मी कुठलाही आमदार, खासदार नाही. मी सर्वसामान्य घरातील कुटुंबातील व्यक्ती असून समाजात जिथे जिथे अडचण येते, तिथे माझं नाव घेतले जात. हाच माझा अभिमान आहे. कुठल्याही पक्षामध्ये कुठल्याही व्यासपीठावर जाण्याची माझी ताकद आहे. शत्रुत्व कमी ठेवून मित्रत्व जास्त ठेवण्याचा हा माझा स्वभाव आहे, असेही विशाल परब बोलताना म्हणाले. तसेच श्री.परब पुढे बोलताना म्हणाले की पत्रकार आबा खवणेकर हे जिल्ह्यात 100 रुपयाचं पेट्रोल घालून ते जिल्हाभर फिरायचे. परंतु आज त्यांनी एक एक असे करून शंभर व्यक्तीची संघटना तयार केल्याने त्यांच्या कार्याला मी सलाम करतो, असेही विशाल परब बोलताना म्हणाले.


यापुढेही विशाल सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई, सिंधुदुर्ग इलेक्ट्रॉनिक्स मीडियाला जे जे सहकार्य लागेल ते आपण आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.


पुरस्कार प्राप्त पत्रकारामध्ये उत्कृष्ठ समाजसेवा पुरस्कार समील जळवी, शोध पत्रकारिता पुरस्कार विष्णू चव्हाण , ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार संजय भाईप, उत्कृष्ठ महिला पत्रकार पुरस्कार संजना हळदिवे, जीवन गौरव पुरस्कार कृष्णा सावंत, ज्येष्ठ पत्रकार कै.रणजित गावडे स्मृती पुरस्कार.  मिलिंद धुरी , आदर्श पत्रकार पुस्कार गोविंद शिरसाट, उत्कृष्ठ शहरी पत्रकार पुरस्कार शिरीष नाईक, ग्रामीण पत्रकार पुरस्कार आनंद कांडरकर, उत्कृष्ठ छायाचित्रकार पुरस्कार विष्णू धावडे, ज्येष्ठ पत्रकार कै. विजय राऊत स्मृती पुरस्कार अभिजित पणदुरकर या सर्व पुरस्कार प्राप्त पत्रकारांचाही उद्योजक विशाल परब, प.पू.सद्गुरू गावडे काका महाराज, सेवानिवृत्त कॅप्टन शंकर भाईप, माजी शिवसेना महिला तालुकाप्रमुख अपर्णा कोठावळे, बांदा वैद्यकीय अधिकारी डाॅ. जगदीश पाटील, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई सरचिटणीस विश्वासराव आरोटे, कोकण विभाग संपर्क प्रमुख बाजीराव फराकटे यांच्यासह उपस्थित व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सर्व पत्रकारांना सन्मानित करण्यात आले. 


बांदा आनंदी कार्यालयामध्ये महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ सिंधुदुर्ग सलग्न इलेक्ट्राॅनिक्स मिडीया मराठी पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी उदघाटक श्री श्री १०८ महंत मठाधीश प.पू.सदगुरू गावडे काका महाराज म्हणाले, पत्रकारीता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ. पत्रकार 24 तास घरदार विसरून समाजाला न्याय मिळवून देण्याच काम करत आहेत. ज्या पत्रकारांनी योगदान दिल.पुरस्कार प्राप्त झालेल्या सर्व सत्कारमूर्तीचे स्वागत.संघटनेच्या पुढील वाटचाली शुभेच्छारूपी आशिर्वाद दिला.

राजकारणी आणि पत्रकार यांचे एक अतूट नाते असते. राजकीय व्यक्ती करीत असलेले काम लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम तुम्ही करता. राजकीय व्यक्ती, समाज आणि पोलीस यांच्यापर्यंत न पोहोचणाऱ्या गोष्टीला आपण वाचा फोडण्याचे काम करता. राजापूर येथील शशिकांत वारीसे यांचे गेलेले बलिदान फुकट जावू देवू नका. सर्वांनी एकत्र येवून त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करुया. यासाठी आमची सर्वांची त्याला साथ असेल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभागीय महिला अध्यक्ष अर्चना घारे-परब यांनी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई सिंधुदुर्ग संलग्न इलेक्ट्रॉनिक मीडिया मराठी पत्रकार संघ यांच्या पत्रकार पुरस्कार सोहळ्यात बोलताना केले.


सूत्रसंचालन सौ. गौरवी पेडणेकर यांनी केले तर प्रास्ताविक व आभार कृष्णा सावंत यानी केले.