कोकणवासीय नारायण राणेंना दिल्लीला पाठवतील : विनोद तावडे

Edited by: विनायक गांवस
Published on: April 24, 2024 15:59 PM
views 296  views

सावंतवाडी : तिसऱ्या टप्प्यात कोकणातील महत्वपूर्ण निवडणूक देशभरात पहायला मिळेल. आज रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात दौरा केला. कोकणवासियांच्या मनात विकसीत भारताची मोदींची गॅरंटी ही ठाम बसली आहे. पंतप्रधान मोदींनी दहा वर्षांत सुरक्षा, शेतकरी, युवकांच केलेल काम, जगात भारताच नाव मोठं करण्यासाठी केलेला प्रयत्न अशा विकसीत भारताच्या अभियानात रत्नागिरी-सिंधुदुर्गतून नारायण राणेंसारखा मातब्बर नेता निवडून गेलाच पाहिजे अशी मानसिकता कोकणी माणसाची आहे.त्यांच्यशी बोलताना ती जाणवली. कोकणातील माणूस हा स्व.बाळासाहेब ठाकरे यांचा मतदार आहे. बाळासाहेबांच्या विचारावर चालायच काम पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार करत आहेत. बाळासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकत ते काम करत आहे. ज्या कॉग्रेसन हिंदुत्वाला विरोध केला त्यांच्या मांडीला मांडी लावून उबाठाची मंडळी बसली आहेत. हे बाळासाहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांना मान्य नाही. बाळासाहेबांवरच प्रेम व मोदींना साथ देण्यासाठी कोकणवासीय नारायण राणेंना निश्चित दिल्लीला पाठवेल असा विश्वास  भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी व्यक्त केला. मोठ्या मताधिक्यान राणेचा विजय होईल असं ते म्हणाले.


ते म्हणाले, शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी युतीतील पक्ष आपले मानले. बाळासाहेबांचे ऋण आम्ही नेहमी व्यक्त करत असतो. बाळासाहेबांनी शिवसेना व भाजप वेगळी मानली नाही. बाळासाहेब असते तर ही वेळच आली नसती. आज विरोधकांकडे मुद्दा नाही आहे. त्यामुळे ते नाहक टीका करत आहे‌. राणेंसारखा माणूस केंद्रात असला तर कोकण विकास जलद होईल, लोक त्याला प्राधान्य अधिक देतील. त्यामुळे रोजगार मोठ्या प्रमाणात इथे येईल असं मत तावडेंनी व्यक्त केल. तर भाजप कुठलच चिन्ह खालसा करत नाही. कॉग्रेसच्या गोटात गेलेलं पवित्र चिन्ह भाजपने सोडवलं असं ते म्हणाले. दरम्यान, २०१९ ला राज्यातून साईडट्रॅक झालेले विनोद तावडे दिल्लीत दिसतील का ? अस विचारल असता, मी भाजपचा सामान्य कार्यकर्ता आहे. कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहीन असं मत विनोद तावडे यांनी व्यक्त केल. याप्रसंगी शिवसेना नेते किरण उर्फ भैय्या सामंत, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार राजन तेली, महिली जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर आदी उपस्थित होते.