भाजप प्रणित जिल्हा सरपंच संघटनेच्या उपाध्यक्षपदी विनोद राऊळ

भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची घोषणा
Edited by: विनायक गांवस
Published on: October 06, 2022 14:12 PM
views 365  views

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील भाजप प्रणित सरपंच-उपसरपंच यांची नव्याने संघटना स्थापन केल्याची घोषणा भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी ओरोस येथे नुकतीच केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व भाजपा प्रणित सरपंच/उपसरपंच गेली दोन वर्षे भाजपा प्रणित सरपंच-उपसरपंच संघटना असावी याकरिता जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्याकडे पाठपुरावा करत होते. परंतु कोरोना कालावधी मुळे या बाबत कार्यवाही करता येत नव्हती. आज अखेर भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी जिल्ह्यातील प्रमुख सरपंचांची बैठक घेऊन सिंधुदुर्ग जिल्हा सरपंच संघटनेची स्थापना करत असल्याची घोषणा केली.

यावेळी सर्वांमते पणदूर सरपंच दादा साईल यांची सरपंच संघटना जिल्हाध्यक्ष म्हणून निवड जाहीर करण्यात आली. उपाध्यक्ष म्हणून नेमळे सरपंच विनोद राऊळ यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली.

त्याचप्रमाणे सहउपाध्यक्ष म्हणून हडपीड सरपंच दाजी राणे, तुळसुली सरपंच नागेश आईर आणि महिला उपाध्यक्ष म्हणून नांदगाव सरपंच आफ्रोज नावलेकर यांची निवड जाहीर करण्यात आली. तर सरचिटणीस म्हणून हडी सरपंच महेश मांजरेकर सहसरचिटणीस असलदे सरपंच  गुरुप्रसाद उर्फ पंढरी वायंगणकर, परबवाडा सरपंच विष्णू उर्फ पप्पू परब आणि संघटक म्हणून रोनापल सरपंच सुरेश गावडे, खजिनदार करंजे सरपंच मंगेश तळगावकर, चिटणीस माडखोल सरपंच संजय शिरसाट, गावराई सरपंच उदय नारळीकर, सल्लागार निरवडे माजी सरपंच प्रमोद गावडे, शिरोडा सरपंच मनोज उगवेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

यावेळी राजन तेली उपस्थित सर्वांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, जरी सरपंच म्हणून कालावधी संपत आला असला तरी आपण सरपंच संघटनेच्या माध्यमातून आदर्श काम निर्माण करून येणाऱ्या निवडणुकीत गाव विकासासाठी भाजप प्रणित सरपंच आणि सदस्य निवडून येण्यासाठी पुढाकार घ्यावा. येत्या कालावधीत आपल्या गावातील प्रलंबित विकास कामे मार्गी लावण्यासाठी भाजपा कटिबद्ध असून त्याकरिता आवश्यक त्या मंत्री महोदयांचे सहकार्य मिळवून देण्याची ग्वाही दिली. 

त्याचबरोबर गेले पाच वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व सरपंच सातत्याने मागणी करत असलेल्या घर बांधकाम परवानगी, स्ट्रीट लाईट बिलांबाबतच्या प्रश्न त्याचप्रमाणे आपले सरकार सेवा केंद्रातील अडचणी दूर करून  घेण्यासाठी आणि जलजीवन मिशन मधील तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी संबंधित खात्यांच्या मंत्र्यांसोबत एकत्रित बैठक घेऊन हा प्रश्न तात्काळ मार्गी लावणार असल्याचे सांगितले. या सरपंच संघटने मार्फत सरपंचांचे विविध प्रश्न आणि गाव विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या सहकार्याने आपण नेहमीच प्रयत्नशील असल्याचे म्हटले आहे. 

यावेळी उपस्थित सर्वांनी एक मताने पणदूर सरपंच दादा साईल यांची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड केल्याने दादा साईल यांनी सर्वांचे आभार व्यक्त करून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण त्याचप्रमाणे माजी खासदार निलेश राणे आमदार नितेश राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपाचे सर्व पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व भाजपा प्रणित सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्या सहकार्याने आदर्शवत काम निर्माण करून आपला सिंधुदुर्ग जिल्हा आदर्श जिल्हा बनविण्याचे नारायण राणे यांचे स्वप्न साकार करूया असे आवाहन केले. त्याचप्रमाणे येत्या काही दिवसात उर्वरित जिल्हा कार्यकारणी व प्रत्येक तालुक्याची कार्यकारिणी आणि संघटनात्मक बांधणीसाठी आठही तालुक्यांचा दौरा करून सर्व  सरपंचांची मीटिंग घेऊन करणार असल्याचे सांगितले.

यावेळी माजी जि प सदस्य प्रितेश राऊळ, नारायण आरडेकर नागवे, हनुमंत पेडणेकर मळगाव, दीनानाथ कशाळीकर सातूळी, दीपक सुर्वे चिंदर, सुभाष दळवी पडवे, वैभव साळस्कर साळशी, सुहास राणे पिसे कामते, महेश शिरवलकर शिरवल, निलेश खोत मळगाव, महेश राजे वजराट, दिलीप तवटे कुपवडे, राहुल गावडे, शैलेश निवरेकर, साबाजी गावडे गोळवण कुमामे आदी उपस्थित होते. नवनियुक्त जिल्हा सरपंच संघटना सल्लागार रोनापाल सरपंच सुरेश गावडे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.