देवगड शहरातून राणेंना मताधिक्य देणार : अजित गोगटे

Edited by: नागेश दुखंडे
Published on: April 24, 2024 12:40 PM
views 85  views

देवगड : देवगड जामसंडे शहराचा प्रचाराचा शुभारंभ देवगड जामसंडे गावचे आराध्य दैवत श्री दिर्बादेवी रामेश्वर चरणी श्रीफळ ठेवून नारायण राणे यांना मोठ्या मताधिक्याने विजय होऊ दे असे साकडे घालत प्रचाराचे श्रीफळ वाढविण्यात आले. देवगड जामसंडे शहरात राणेंना मताधिक्यही काळ्या दगडावरची रेघ असून विनायक राऊत पुन्हा खासदार होणार नाही अशी प्रतिक्रिया माजी आमदार अजित गोगटे यांनी व्यक्त केली.

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे भाजप शिवसेना राष्ट्रवादी मनसे आरपीआय घटक पक्ष महायुती उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या देवगड जामसंडे शहरातील प्रचाराचा शुभारंभ मंगळवारी श्री दिर्बादेवी रामेश्वर मंदिरात श्रीफळ वाढवून करण्यात आली यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मताधिक्य मिळावे यासाठी गाऱ्हाणे घालण्यात आले त्यानंतर मंदिर परिसरात राणेंच्या विजयासाठी घोषणा देण्यात आल्या यावेळी महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी जिल्हा भाजप निमंत्रित सदस्य बाळ खडपे,जिल्हा उपाध्यक्ष प्रियांका साळसकर, तालुका अध्यक्ष संतोष किंजवडेकर, सरचिटणीस शरद ठुकरुल, महिला अध्यक्ष उष कला केळुसकर, तन्वी शिंदे, शहर अध्यक्ष दयानंद पाटील, योगेश पाटकर, माजी जि प सदस्या मनस्वी घारे, गणपत गावकर, माजी उपनगराध्यक्ष संजय तारकर, उमेश कणेरकर, नगरसेविका प्रणाली माने, रुचिता पाटकर, मनीषा जामसंडेकर, स्वरा कावले, प्राजक्ता घाडी अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.