विनायक राऊतांनी केलं तरी काय ? : दीपक केसरकर

महायुतीचाच उमेदवार जिंकणार !
Edited by: विनायक गांवस
Published on: March 09, 2024 13:04 PM
views 36  views

'पुस्तकांच गाव', 'कवितांच गाव' चा उद्या शुभारंभ

सावंतवाडी : सिंधुदुर्ग-रत्नागिरीचा खासदार हा महायुतीचाच असणार असा विश्वास शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. तर कबुलायतदार गांवकर जमिन वाटपाचा निर्णय आम्ही घेतला असून त्याच वाटप करण्यात येणार आहे. या प्रश्नांत लक्ष घातलं नव्हतं म्हणणाऱ्या खासदार विनायक राऊत यांनी दहा वर्षांत कक्षात लक्ष घातलं ? खासदार असताना त्यांनी केलं काय ? असा सवाल करत दीपक केसरकर यांनी खा.राऊतांवर पलटवार केला. दरम्यान, रविवारी पोंभुर्लेत होणाऱ्या 'पुस्तकांच गाव' व उभादांडा येथील 'कवितांच गाव' उपक्रमाच्या शुभारंभाला उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केलं.


मंत्री दीपक केसरकर म्हणाले, एक-दोन दिवसात लोकसभेच्या जागा जाहीर होतील. जो महायुतीचा उमेदवार असेल त्याला आम्ही भरघोस मतांनी निवडून आणू. राज्यात महायुती घट्ट असून ४८ पैकी ४७ खासदार हे युतीचे असतील असा विश्वास दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. तर गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत देखील महायुतीच्या प्रचारासाठी येतील अस ते म्हणाले. सावंतवाडी येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कबुलायतदार गांवकर जमिन वाटपाचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्यासंदर्भात वन सचिवांसोबत महत्त्वाची बैठक देखील पार पडली. या प्रश्नातून मार्ग काढण्यासाठीची चर्चा यावेळी झाली. त्याप्रमाणे जिल्हाधिकारी यांनी वन खात्यास प्रस्ताव पाठवल्यानंतर वन जमिन वाटत होईल. त्यामुळे आंबोलीतील मुख्य प्रश्न सुटेल. या मध्ये मोठी बांधकाम काढण्याची करवाई झाली असली तरी पुढील काळात हा प्रश्न सुटेपर्यंत कोणतीही कारवाई होणार नाही. मात्र, नवीन बांधकाम करण्याचा कुणी प्रयत्न करू नये. तसं केल्यास कारवाई होईल. तर जी कारवाई झाली त्यावेळी संबंधितांना स्वःताहून बांधकाम हटविण्यासाठी सांगितलं होतं. मात्र, ते न हटविल्यान त्यांना नुकसानीस सामोरं जावं लागलं असं मंत्री केसरकर म्हणाले.


उद्या शानदार शुभारंभ !

रविवारी देवगड येथील पोंभुर्लेत पुस्तकांच्या गावाचा शुभारंभ होणार आहे. या ठिकाणी ललित साहित्य, बाल साहित्य हे गावात विविध ठिकाणी ठेवलं जाणार आहे. आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर, साने गुरुजी यांच्या गावास सहा ठिकाणी राज्यात हा उपक्रम राबविण्यात येत आहे. तसेच कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या वेंगुर्ला उभादांडा या जन्मगावी कवितांच गाव या संकल्पनेचा शुभारंभ होणार आहे. मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी आम्ही वर्षभर विविध उपक्रम राबविले. भव्य असं मराठी भवन मुंबईत होत आहे. साहित्य चळवळीला प्रेरणा मिळावी यासाठी विविध उपक्रम आम्ही राबवित आहोत. मराठी भाषा जपण्यासाठी भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे‌. मराठी भाषेचा अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. लवकरच तो दर्जा मराठी भाषेला मिळेल. पोंभुर्लेत बाळशास्त्री जांभेकरांच्या गावी होणाऱ्या पुस्तकांच गाव व मंगेश पाडगांवकर यांच्या जन्मगावी होणाऱ्या कवितांच गाव या शुभारंभ प्रसंगी उपस्थित रहावं असं आवाहन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी केलं.


खा. राऊतांनी केलं काय ?

दरम्यान, बडे नेते यात असल्यानं कबुलायतदार प्रश्नात आपण लक्ष घातल नव्हतं अस विधान करणाऱ्या खासदार विनायक राऊत यांचा समाचार केसरकर यांनी घेतला. खासदार विनायक राऊत यांनी दहा वर्षांत कुठल्याच प्रश्नाकडे लक्ष दिलं नाही. ते खासदार असताना त्यांनी काहीच केलं नाही. लोकांची दिशाभूल करण्याच काम विनायक राऊत यांनी केलं. उद्धव ठाकरेंसारखे ते प्रती मुख्यमंत्री होते असा टोला त्यांनी हाणला.


मल्टीस्पेशालिटीचा प्रश्न लवकरच मार्गी !

तर सावंतवाडी मल्टीस्पेशालिटीचा प्रश्न देखील मार्गी लागणार आहे. राजघराण्याच्या पत्राच्या प्रतिक्षेत हा प्रश्न असून त्यांच्या अंतर्गत गोष्टीमुळे त्या पत्राला विलंब होत आहे. परंतु, लवकरात लवकर हे पत्र राजघराण्याकडून दिलं जाईल असं आश्वासन राजघराण्यानं दिलं असल्याची माहिती दीपक केसरकर यांनी दिली.