विनायक राऊतांकडून सावंतवाडी शहरांत प्रचाराचा शुभारंभ

Edited by: विनायक गावस
Published on: April 20, 2024 14:40 PM
views 181  views

सावंतवाडी: रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी सावंतवाडी शहरात प्रचाराचा शुभारंभ केला. शहरातील बाजारपेठेत मतदारांच्या भेटीगाठी त्यांनी घेतल्या.


अँड. दिलीप नार्वेकर, बबन साळगावकर, ॲड संदीप निंबाळकर, गुरु गावडे, अनिल होडावडेकर, मनोहर वेंगुर्लेकर, विलास जाधव यांच्या निवासस्थानी भेट दिली. भाईसाहेब सावंत समाधी भेट घेत बाळा बोर्डेकर, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, अर्चना घारे यांच्या कार्यालयात भेट दिली. त्यानंतर  सावंतवाडी बाजारपेठ जात व्यापारी वर्गासह मतदारांची भेट घेतली. स्वर्गीय माजी आमदार जयानंद मठकर यांना वंदन करून बाबल्या दुभाषी, प्रकाश सुकी, देवा टेंमकर, शेखर सुभेदार, विकास सावंत यांची त्यांनी भेट घेत सदिच्छा व आशीर्वाद घेतले.