
देवगड : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कार्यकारणी जाहीर झाली असून, त्यामधील देवगड कार्यकारणी मध्ये देवगड तालुकाध्यक्ष पदी संतोष मयेकर यांची निवड करण्यात आली आहे. तसेच देवगड तालुका संपर्क अध्यक्षपदी विमोल मयेकर यांना नियुक्ती पत्र आज देण्यात आले.तरी देवगड तालुक्यातील अन्य विभागीय पदांची निवड करून ती लवकरच जाहीर करण्यात येतील, अशी माहिती आज जिल्हा संपर्क अध्यक्ष संतोष भाऊ शिंगाडे यांनी दिली.
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले राजसाहेब ठाकरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पक्ष निरीक्षक राज्य सरचिटणीस संदीप दळवी, कामगार सेनेचे सरचिटणीस गजानन राणे यांनी टाकलेल्या विश्वासाला पात्र ठरवून देवगड विधानसभा क्षेत्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून अधिकाधिक शाखेच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचून भविष्यातील स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील विधानसभा निवडणुका असतील अशा अनेक निवडणूक प्रक्रियांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला प्रबळ संख्याबळ देण्यासाठी सर्वतोपरी मेहनत करून भविष्यात सिंधुदुर्ग जिल्हा मनसेमय करण्यासाठी प्रयत्नशील असेन असे प्रतिपादन संतोष भाऊ शिंगाडे यांनी केले. तसेच भविष्यात शाखा निहाय कार्यक्रम घेऊन गाव तेथे शाखा हा उपक्रम अधिक तीव्रतेने राबविणार असल्याचे सांगितले.