हत्तींसाठी आयनोडे बोर्येवाडीत होणारा खाद्य निर्मिती प्रकल्प ग्रामस्थांनी रोखला

वनाधिकाऱ्यांनी ठणाकावत विचारला जाब
Edited by: संदीप देसाई
Published on: May 18, 2023 19:21 PM
views 94  views

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यात तिलारी खोऱ्यात हेवाळे बाबरवाडी गावाच्या हद्दीवर आयनोडे बोर्येवाडी येथे तिलारी प्रकल्पाने संपादित केलेल्या जमिनीत वनविभागाने वन्य प्राण्यांसाठी खाद्य निर्मिती करीता हाती घेतलेला प्रकल्प स्थानिकांना नुकसानदायक असल्याने आणि हत्तींना थोविण्याएवजी हा प्रकल्प निमंत्रण देणारा असल्याने या प्रकल्पाला हेवाळे बाबरवाडी व बोर्येवाडी ग्रामस्थांनी जोरदार आक्षेप नोंदवत वन विभागाने सुरू केलेले काम वनक्षेत्रपाल अरूप कन्नमवार यांना तातडीने बंद करण्यास भाग पाडले.

हत्ती व अन्य वन्य प्राण्यांना आपल्याला अन्नधान्य व खाद्य निर्मिती करायची असेल तर तिलारी धरणाच्या पुढील क्षेत्रात केंद्र सारख्या निर्जन स्थळे करा किंवा वनविभागाच्या लोकवस्ती पासून दूर असलेल्या जंगलात करा थेट लोक वस्ती लगत आपण अशा प्रकारचा प्रकल्प राबवून अगोदरच हत्तींच्या उपग्रहात हैराण झालेल्या नागरिकांना अधिक वेठीस धरत आहात असा मुद्दा हिवाळे बावळट बोरेवाडीतील ग्रामस्थांनी मांडला. मंगळवारपासून सुरू झालेल्या या प्रकल्पाच्या कामास स्थानिकांना सुगाव लागतात तातडीने त्यातील ग्रामस्थांनी आक्षेप नोंदवला होता. त्याच पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळी 16 मार्च वनक्षेत्रपाल आरोप कन्नमवार हे बोरिवली येथे दाखल झाले व तेथील ग्रामस्थांच्या व शेतकऱ्यांच म्हणणं त्यांनी जाणून घेतल. यावेळी तेथील उपसरपंच समीर देसाई, ग्रामस्थ हनुमंत गवस, समीर देसाई, विलास नाईक, विकास ठाकूर, दयानंद सावंत, संजय सावंत, राकेश नाईक, दिनेश कुंभार, उत्तम ठाकूर आदींनी आपले म्हणणे त्यांचे समोर मांडले.  आपल्याला जर दोडामार्ग तालुक्यात वाढता हत्ती व वन्यप्राणी उपद्रव थोपवण्यासाठी खाद्य निर्मिती करण्याचा प्रकल्प राबवायचा असेल तर लोकांच्या घराजवळ व लोक वस्ती जवळ असा प्रकल्प राबविणे हे योग्य नाही. हा प्रकल्प खरंतर तिलारी धरणाच्या बुडीत क्षेत्रात केंद्रे येथे राबविणे आवश्यक असताना वन विभाग चुकीच्या पद्धतीने ग्रामपंचायत आयनोडे हेवाळे कार्यक्षेत्रात अगदी हेवाळे बाबरवाडी गावाला लागून असलेल्या बोर्येवाडी येथे कसा काय करते असा सवाल उपस्थित केला. यावेळी वनक्षेत्रपाल यांनी स्थानिकांची समजूत काढण्याचा बराच वेळ प्रयत्न केला, मात्र आतापर्यंत वनविभागाने फक्त आश्वासने दिली, घोषणा केल्या. मात्र हत्तींचा बंदोबस्त कुठच्याही उपायोजनाने झालेला नाही आणि जर हा प्रकल्प गावालगत राबविला तर स्थानिकांना त्याचा अधिक फटका बसणार असल्याने व या ठिकाणी खाद्य तयार झाल्याने हत्ती कायमस्वरूपी स्थिरावणार असल्याने असा प्रकल्प इथे करता नये असे शेतकऱ्यांनी ठणकावले.

 तिलारी खोऱ्यात  बांबर्डे, सोनावल, पाळये, मोर्ले, केर व हेवाळे बाबरवाडी येथे उपद्रव घालणारे हत्ती व अन्य वन्य प्राणी याच भागात त्यांच्यासाठी खाद्य उपलब्ध झाल्यास या ठिकाणी स्थिरवणार आहेत. आणि त्याचा मोठा फटका स्थानिकांच्या शेती बागायतीचेही नुकसान होऊन होणार आहे. त्यामुळे हेवाळे बाबरवाडी आणि बोर्येवाडी येथील नियोजित प्रकल्प वनविभागाने वनक्षेत्रात किंवा तिलारी धरणाच्या बुडीत क्षेत्रात राबवावा अशी जोरदार मागणी केली. त्यामुळे आपण हे काम तूर्तास थांबवित असून आपले म्हणणे वरिष्ठांच्या कानावर घालण्याचे आश्वासन वनक्षेत्रपाल कन्नमवार यांनी ग्रामस्थांना दीले. तर ग्रामस्थ मागणी नुसार ग्रामपंचायतने ग्रामस्थांचे हे म्हणणे लेखी स्वरुपात वनविभागाला दिले आहे.  यावेळी  वनपाल शीरवलकर व स्थानिक वनरक्षक उपस्थित होते.