
वेंगुर्ले: तालुक्यात सरपंच पदासाठी ७८ तर सदस्य पदासाठी ४३१ उमेदवार रिंगणात आहेत. आज नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या दिवशी सरपंच पदासाठी एकूण १०४ वैध अर्जांपैकी २६ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले तर सदस्य पदासाठीच्या ४८१ वैध अर्जांपैकी ५० उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. तालुक्यात पाल ग्रामपंचायतवर सरपंच व सर्व सदस्यांची बिनविरोध तर ग्रामपंचायत वर सरपंच यांची बिनविरोध निवड झाली आहे.
आज ७ डिसेंबर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी तालुक्यातून सरपंच पदासाठी राखी सुरेश कोंडस्कर (आडेली), फटू शांताराम गावडे, महादेव भालचंद्र गावडे (अणसुर), लक्ष्मी नारायण पार्सेकर (होडावडा), विजय यशवंत कुडव, बापशेट पांडुरंग चव्हाण (कोचरा), सुशीला संतोष नांदोस्कर (मठ), प्रकाश रघुनाथ खोबरेकर (मेढा), सुचिता सुरेश नाईक, मंगल नारायण गावडे (पाल), गुणाजी कृष्णा राऊळ, हरेश वसंत शेर्लेकर, अर्जुन लक्ष्मण कानडे, अनिल सिताराम येरम, बाळकृष्ण गणपती गाडगीळ (पालकरवाडी), रामेश्वरी राधाकृष्ण गवंडे (परबवाडा), प्रणिता पुरुषोत्तम प्रभू (परुळेबाजार), समृद्धी श्रीकृष्ण धानजी, रश्मी राजन डिचोलकर, शितल राजेश साळगावकर, विदुला विनायक निकम (शिरोडा), शितल सचिन नाईक (तुळस), हितेश चिंतामणी धुरी (उभादांडा), प्रेरणा प्रेमानंद सावंत भोसले, पल्लवी प्रकाश पडवेकर, (वजराट), प्रणाली प्रशांत नाईक (वेतोरा) यांनी आपले अर्ज मागे घेतले.
तर सदस्य पदासाठी गोपाळ मनोहर आसोलकर, भास्कर सदाशिव नाबर, निवृत्ती चंद्रकांत नाईक (आसोली), सिद्धेश प्रकाश वायंगणकर, भक्ती भगवान कासवकर, तुषार महेश्वर सामंत (भोगवे), राजाराम यशवंत कांबळे, संकेत एकनाथ राऊळ, विष्णू अनंत दाभोलकर (दाभोली), पुनम अजय नाईक, समीर विश्वास सावंत, महादेव भिकाजी मयेकर, चंद्रकांत श्रीधर दळवी, महादेव सुधाकर दळवी, दिव्या राघोबा जाधव, प्रिया प्रसाद परब, प्रसाद शिवराम मराठे (होडावडा), बापशेठ पांडुरंग चव्हाण (कोचरा), नवज्योत महादेव सापळे, मनोहर राजाराम येरम, निलेश दिगंबर परुळेकर (कुशेवाडा), संकेत सदानंद निवजेकर, सुकन्या सुनील तेंडुलकर (मठ), प्रसाद संभाजी परब, सुभाष वासुदेव माळकर, इच्छाराम सुरेश केळुस्कर, सुशांत दयानंद ठाकूर, लवू अर्जुन मेस्त्री, ममता मधुकर कांबळी (म्हापण), संध्या कृष्णा गावडे, प्रभाकर विष्णू गावडे, आत्माराम प्रभाकर गावडे, मनोहर अनंत गावडे (पाल), गुणाजी कृष्णा राऊळ, सिद्धेश काशिनाथ माळकर, सदाशिव यशवंत पाटील (पालकरवाडी), रामेश्वरी राधाकृष्ण गवंडे, कृष्णाजी बाबाजी सावंत, राधाकृष्ण नारायण गवंडे, रवींद्र गणपत परब, विष्णू चंद्रकांत परब (परबवाडा), श्वेता सुनील चव्हाण यांचे दोन अर्ज मागे (परुळेबाजार), संजय लवू कांबळी (रेडी), कुणाल जगदीश बांदेकर, संजय गुरुनाथ फडणाईक, समृद्धी श्रीकृष्ण धानजी (शिरोडा), अनंत रामचंद्र परब (तुळस), घाब्रियल फ्रान्सिस ब्रिटो, तातो बाळकृष्ण नवार (उभादांडा) यांनी आपले अर्ज मागे घेतले.