
वैभववाडी : तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपचे दोन सरपंच बिनविरोध झाले. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे निवडणूक प्रभारी असलेले अरुळे, निमअरुळे सरपंच बिनविरोध निवडून आलेत.श्री. रावराणे यांनी पुन्हा एकदा आपला करिश्मा दाखविला आहे.
तालुक्यात १७ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका होत आहे. यामध्ये थेट सरपंच पदासाठी निवडणूक होत आहे. तसेच १२५ सदस्य पदांकरिता निवडणूक होत आहे. भाजपाने या निवडणुकीकरिता मोठी ताकद लावली आहे.तालुक्यातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांवर प्रत्येक गावांची जबाबदारी देण्यात आली आहे. यामध्ये प्रमोद रावराणे अरुळे व निमअरुळे ग्रामपंचायतीचे पक्षाचे प्रभारी होते. या दोन्ही ग्रामपंचायतीवर भाजपचे सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत.दोन्ही ग्रामपंचायती बिनविरोध होण्यासाठी श्री रावराणे यांची भुमिका महत्त्वाची होती.अरुळे सरपंच पदी मानसी नितीन रावराणे ,निमअरुळे सज्जन माईणकर यांची निवड झाली. या दोन्ही नवनिर्वाचित सरपंचांचे श्री. रावराणे यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी तालुका सरचिटणीस सुधीर नकाशे,संजय रावराणे,विजय रावराणे, सुनील रावराणे,नंदकुमार आम्रस्कर,बाबू भिसे,नितीन रावराणे ,श्री. देसाई आदी उपस्थित होते.