
कणकवली : ग्रामपंचायत निवडणुकीकरिता रविवारी सकाळपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत कणकवली तालुक्यात सर्वत्र मतदान शांततेत पार पडलेले असतानाच ५.३० वा कणकवली तालुक्यातील लोरे नंबर 1 येथे भाजपा व शिवसेनेच्या कार्यकर्त्यामध्ये जोरदार राडा झाला. निवडणुकीच्या काळात एक बॅनर फाडल्याचे निमित्त होते. त्या मुद्द्यावरून हा वाद उफाळल्याचे समजते. त्यानंतर दोन्ही बाजूने एकमेकांना खुन्नस देत गावाबाहेर असलेल्या एकाने गावातील काहींना मारहाण केल्याचा आरोप करत गावातील दुसऱ्या गटातील कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. यावरून दोन्ही बाजूने नेते पदाधिकाऱ्यांनी रविवारी रात्री उशिरा पोलिसात धाव घेतली होती.