शिराळेच्या ऐतिहासिक गावपळणीला प्रारंभ

गांगो देवाचा कौल घेऊन गाव वेशीबाहेर
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: January 08, 2025 16:42 PM
views 622  views

वैभववाडी : तालुक्यातील शिराळे गावच्या गावपळणीला आजपासून सुरुवात झाली आहे. आज सायंकाळी संपूर्ण गाव वेशीबाहेर येणार आहे. सडुरे दौंडोबा येथे झोपड्या बांधून संसार थाटला आहे.

 सुमारे ४५०वर्षांची परंपरा असलेला शिराळे गावपळणीला आजपासून प्रारंभ होत आहे. आज सायंकाळी संपूर्ण गाव सून सून  होणार आहे. गावचे ग्रामदैवत श्री गांगो देवाचा काल (मंगळवारी ७) कौल झाला.त्यांनतर गावकऱ्यांनी हा निर्णय घेतला. पुढील काही  दिवस संपुर्ण वेशीबाहेर असणार आहे.