'पुस्तकांचे गाव ग्रंथालय' | वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Edited by: नागेश दुखंडे
Published on: March 31, 2024 10:20 AM
views 140  views

देवगड : पर्यटनाबरोबरच पोंभुर्ले-मालपे गावाचा विकास व्हावा,यासाठी वाचन चळवळीला व्यापक स्वरूप देण्यात यावे व लोकांचे जीवनमान उंचवावे, यासाठी पुस्तकांचे गाव ग्रंथालय उभारले आहे. या पुस्तकांचे गाव ग्रंथ दालनात अनेक गावागावांतून वाचक येत असून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. देवगड तालुक्यातील पोंभुर्ले मालपे येथील विस्तार प्रकल्पांतर्गत अॅग्रो टुरिझम यांच्या ग्रंथ दालनात पुस्तकांच्या गावच्या पहिल्या दालनाचे उदघाटन काही महिन्यांपूर्वी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले होते.

ग्रामीण पर्यटन कसे असावे, याचा एक नमुनाच पोंभुर्ले मालपे गावामध्ये निर्माण केला आहे आणि याच ठिकाणी पर्यटनाबरोबर साहित्याची जोड देऊन मालपेकरांची पुस्तकांचे गाव योजनेंतर्गत याच टुरिझम अॅग्रोमध्ये ग्रंथदालन शासनातर्फे उभारण्यात आले आहे. अनेक ग्रंथ पुस्तके या ठिकाणी उपलब्ध असून, राज्यभरातून अनेक साहित्यिक कवी, गझलकार या ठिकाणी भेट देत आहेत.