विलास बिडये यांचे निधन

Edited by: नागेश दुखंडे
Published on: December 13, 2025 12:44 PM
views 65  views

कणकवली : कणकवली शहरातील शिवाजीनगर येथील विलास धोंडू बिड्ये (७७) यांचे शुक्रवारी सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

कणकवली शहरातील काशीविश्वेश्वर मंदिरातील दानपेटीची जबाबदारी विलास यांच्याकडे असे. कणकवली शहरात या दानपेटीच्या माध्यमातून देणगी गोळा करण्यासाठी ते निस्वार्थी भावनेने काम करत. काशीविश्वेश्वर मंदिरातील तसेच भालचंद्र महाराज संस्थानमधील कार्यक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. कणकवली शहरात माऊली या नावाने देखील त्यांना ओळखले जाई.‌त्यांच्या पाश्चात पत्नी, तीन मुलगे दोन मुली, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. कणकवलीतील अनंत, नंदू व शिवा बिडये यांचे ते वडील होत.