
कुडाळ : मुंबई–गोवा महामार्गावर कुडाळ–पावशी येथे आज दुपारी सुमारे ३.३० वाजण्याच्या सुमारास कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे.
प्राप्त माहितीनुसार, मुंबईहून गोव्याकडे जाणारी भरधाव एक्टिवा दुचाकी पुढे जाणाऱ्या रेनॉल्ट कारला मागून धडकली. या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याला तत्काळ उपचारासाठी कुडाळ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघातात दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच कुडाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.











