
कुडाळ : भारतीय जनता पार्टीचे ओरोस मंडळ अध्यक्ष आनंद उर्फ भाई सावंत यांनी वेताळ बांबर्डे गावात सामाजिक बांधिलकी जपत स्वखर्चातून शाळा आणि शासकीय कार्यालयासाठी महत्त्वपूर्ण मदत केली आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सावंत यांनी पूर्ण प्राथमिक शाळा, देऊळवाडी (वेताळ बांबर्डे) या शाळेला स्वखर्चाने कलर प्रिंटर भेट दिला. शाळेच्या शैक्षणिक कामात सुलभता यावी यासाठी त्यांनी ही मदत केली. तसेच, वेताळ बांबर्डे तलाठी कार्यालयातील महत्त्वाची कागदपत्रे आणि दप्तर सुरक्षित राहण्यासाठी त्यांनी कार्यालयाला कपाट भेट दिले.
शाळेतील कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती
शाळेत प्रिंटर प्रदान करतेवेळी भाजप ओरोस मंडळाचे सरचिटणीस शैलेश बांबर्डेकर व दिनेश जयतापकर, ओबीसी जिल्हा सेल अध्यक्ष छोटू पारकर, वेताळ बांबर्डे विभागाचे शक्ती केंद्रप्रमुख अरविंद बांबर्डेकर, महिला मोर्चाच्या सौ. स्मिता बांबर्डेकर, ग्रामपंचायत सदस्य दशरथ कदम, प्रदीप गावडे, साजुराम नाईक, रश्मी तिवरेकर, तसेच प्रसाद बांबर्डेकर, महादेव परब, संदीप सावंत, दिनेश शिरवळकर आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सोनू कदम यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तलाठी कार्यालयात भगीरथ प्रतिष्ठानच्या अध्यक्षांची उपस्थिती
तलाठी कार्यालयात कपाट भेट देण्याच्या कार्यक्रमाप्रसंगी भगीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर यांची विशेष उपस्थिती होती. यासोबतच ओबीसी जिल्हा सेल अध्यक्ष छोटू पारकर, सरचिटणीस शैलेश बांबर्डेकर, दिनेश जयतापकर, शक्ती केंद्रप्रमुख अरविंद बांबर्डेकर, महिला मोर्चाच्या सौ. स्मिता बांबर्डेकर, प्रभाग अध्यक्ष प्रसाद बांबर्डेकर, उपसरपंच शैलेश घाटकर, ओरोस ग्रा.पं. सदस्य अमित भोगले, तसेच ग्रा.पं. सदस्य दशरथ कदम, प्रदीप गावडे, साजुराम नाईक, रश्मी तिवरेकर, सृष्टी सावंत, समृद्धी कदम, महादेव परब आणि ग्रामस्थ उपस्थित होते.










