...अखेर महाविकास आघाडीच्या नगरसेवकांवर गुन्हे दाखल !

विकसित भारत संकल्प यात्रेवेळी गोंधळ
Edited by: भरत केसरकर
Published on: December 30, 2023 11:59 AM
views 231  views

कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्या पटांगणावर काल शुक्रवारी शासनाच्या वतीने विकसित भारत संकल्प यात्रेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र मोदी सरकार या नावास आक्षेप घेत कुडाळ नगरपंचायतीच्या महाविकास आघाडीच्या सत्ताधारी नगरसेवकांनी हा कार्यक्रम रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी भाजप व ठाकरे शिवसेना नगरसेवकांमध्ये जोरदार घोषणाबाजी व नंतर धक्काबुक्की झाली होती. याप्रकरणा नंतर माजी खासदार निलेश राणे काल रात्री उशिरा कुडाळ पोलीस ठाण्यात दाखल झाले. यावेळी त्यांनी आक्रमक भुमिका घेत कार्यक्रम रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर ताबोडतोब गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.

शेवटी रात्री उशिरा कुडाळ नगरपंचायतचे मुख्याधिका-यांनी स्वतः पोलीस ठाण्यात येऊन महाविकास आघाडीच्या नगरसेवकांविरोधात तक्रार दिली. त्यानुसार ठाकरे शिवसेना गटाचे उपनगराध्यक्ष किरण शिंदे, मंदार शिरसाट, उदय मांजरेकर, सचिन काळप, संतोष शिरसाट या महाविकास आघाडीतील नगरसेवकांसह इतर १० ते १२ जनांवर शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले.