शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी अध्यक्षपदी विक्रांत सावंत

Edited by: विनायक गांवस
Published on: September 24, 2025 23:44 PM
views 127  views

सावंतवाडी : माजी आरोग्यमंत्री, कै. भाईसाहेब सावंत यांचे नातू आणि काँग्रेसचे नेते कै. विकास सावंत यांचे सुपुत्र, विक्रांत सावंत यांची आर.पी.डी हायस्कूल, शांतिनिकेतन विद्यालय आणि जे. बी. नाईक महाविद्यालय संचलित शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. सर्वांना बरोबर घेऊन आपण शैक्षणिक प्रगती साधण्यासाठी संधीचा पुरेपूर उपयोग करणार आहे. ज्यांनी संस्थेच रोपटे लावले आणि जोपासले त्या सर्व मान्यवरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करणार असे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. सावंत यांनी सांगितले.

शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीच्या अध्यक्षपदी विक्रांत सावंत यांची बिनविरोध निवड झाली. विकास सावंत यांचे नुकतेच निधन झाले होते. त्यामुळे अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, सचिव व्ही. बी नाईक, खजिनदार सी एल नाईक, सदस्य अमोल सावंत, चंद्रकांत सावंत, संदीप राणे, सतिश बागवे,सौ वसुधा मुळीक,सौ छाया सावंत, सौ स्नेहा परब आदी उपस्थित होते. यावेळी झालेल्या बैठकीत बिनविरोध निवड करण्यात आली.

यानंतर अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष अँड सुहास सावंत, काका मांजरेकर, संजय कानसे, रवींद्र म्हापसेकर, जगदीश धोंड, मुख्याध्यापक संप्रवी कशाळीकर, उपमुख्याध्यापक डॉ सुमेधा नाईक धुरी, प्रसाद सावंत, श्री. नंदीहल्ली, संदीप सुकी, संजय लाड,राजू राणे यांच्या सह मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.


केजी टु पीजी पर्यंत शिक्षण देणाऱ्या साडेचार हजार विद्यार्थी असलेल्या संस्थेचा अध्यक्ष पदावर मला सर्व ज्येष्ठ मार्गदर्शकांनी अध्यक्षपदी निवड करून जो विश्वास दाखवला आहे,तो दृढ करण्यासाठी प्रयत्न करणार आहे असे नुतन अध्यक्ष विक्रांत सावंत यांनी सांगितले. ते म्हणाले, माजी मंत्री कै. भाईसाहेब सावंत हे आजोबा तर कै. विकासभाई सावंत हे वडील यांचा आदर्श माझ्या मनात आहे. त्याशिवाय माजी आमदार कै प्रतापराव भोसले, कै. जे बी नाईक,कै बी एस नाईक अशा संस्था निर्माण करणाऱ्या आणि ती वटवृक्षात रूपांतर करणाऱ्या सर्व महनीय व्यक्तींचा आदर्श घेऊन वाटचाल करणार आहे. माझे आजोबा कै भाईसाहेब सावंत यांनी मंत्री होण्याअगोदर संस्थेसाठी मोठे योगदान दिले आहे. तर वडील कै विकास सावंत यांनी शेवटच्या श्वासापर्यंत संस्थेला यशाची शिखरे पादाक्रांत करण्यासाठी पुढाकार घेतला होता. ती जाणीव ठेवून काम करत राहणार आहे. शिक्षण प्रसारक मंडळाच्या आर पी डी हायस्कूल,जे बी नाईक महाविद्यालय, शांतिनिकेतन विद्यालय आदी सर्व संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी यशस्वी होत संस्थेचे नावलौकिक निर्माण करावे यासाठी पुढील काळात प्रयत्न करत राहणार आहे असे विक्रांत सावंत यांनी सांगितले.