ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या जिल्हाअध्यक्षपदी विजय खरात

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: July 14, 2025 20:30 PM
views 56  views

कणकवली : ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी विजय  श्यामसुंदर खरात यांची फेरनिवड करण्यात आली आहे. महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांनी फेरनिवडीचे पत्र देत ही निवड जाहीर केली आहे.

धनगर समाजाचे संवर्धन आणि समाजहिताचे रक्षण व्हावे या हेतुने राष्ट्रीय पातळीवर पोटशाखा भेद, प्रांतभेद, भाषाभेद, बाजूला ठेऊन सर्व धनगर समाज एक होत आहे. या राष्ट्रीय प्रवाहात आपणास सहभागी करुन घेऊन आपल्या आजपर्यंतच्या समाज सेवेचा यथोचित गौरव करावा व आपणास आणखी विस्तारीत कार्यक्षेत्र उपलब्ध व्हावे. या हेतूने आम्ही आपली ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष (फेरनिवड) पदी निवड करीत आहोत असे पत्रात म्हटले आहे.विजय खरात यांनी सत्यशोधक विद्यार्थी संघटना, धनगर समाज उन्नती मंडळ संघटना, कणकवली कॉलेज विश्व प्रतिनिधी अशा विविध पदांवर काम केले आहे.