विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज मातोंडच्या सातेरी जत्रोत्सवाला देणार भेट

Edited by: भरत केसरकर
Published on: November 26, 2023 10:43 AM
views 118  views

वेंगुर्ले : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर वेंगुर्ले तालुक्यातील मातोंड गावी आज येणार आहेत. राहुल नार्वेकर हे काल गोव्यात दाखल झाले आहेत. ते आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून हा दौरा खाजगी दौरा आहे. वेंगुर्ले तालुक्यातील मातोंड येथील श्री देवी सातेरी जत्रोत्सवाला ते रात्री दहा वाजता सहकुटुंब भेट देणार आहेत.

मातोंडची सातेरी देवी हे राहुल नार्वेकर यांचे ग्रामदैवत आहे. ही लोटांगणाची जत्रा म्हणून प्रसिद्ध आहे. या जत्रेसाठी खास मुंबईहून विमानाने गोव्यात दाखल झाले आहेत. दरवर्षी राहुल नार्वेकर हे सहकुटुंब देवीचे दर्शन घेतात. दोन वर्षांपूर्वी स्वता लोटांगण घालत राहुल नार्वेकर यांनी नवस फेडला होता. आज रात्री दहा वाजता ते सातेरी देवीच सहकुटुंब दर्शन घेणार आहेत. गेल्यावर्षी पण त्यांनी जत्रोत्सवाला भेट देवून दर्शन घेतल होत.