विज्ञान मेळाव्यात विभव राऊळचं सुयश

Edited by: विनायक गांवस
Published on: July 24, 2024 08:19 AM
views 187  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळ आयोजित 'अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा २०२४' मध्ये सिं.जि.शि.प्र. मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल, सावंतवाडीचा इ. ८वीतील विद्यार्थी कु. विभव विरेश राऊळ याने प्रथम क्रमांक पटकावत नेत्रदीपक यश संपादीत केले. या स्पर्धेसाठी तालुक्यातील अनेक शाळा सहभागी झाल्या होत्या. कु. विभव राऊळ याने 'कृत्रिम बुद्धिमत्ता संभाव्यता व आव्हाने' या विषयावर उत्कृष्ट व अभ्यासपूर्ण सादरीकरण करून यश संपादित केले. त्यामूळे त्याची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

कु. विभव यास प्रशालेच्या विज्ञान शिक्षिका श्रीम. प्राजक्ता मांजरेकर यांनी बहुमोल मार्गदर्शन केले. यशस्वी विदयार्थ्यांचे सिं. जि. शि. प्र. मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले, चेअरमन श्रीमंत राणीसाहेब सौ. शुभदादेवी भोंसले, कार्यकारी विश्वस्त श्रीमंत लखम सावंत भोंसले, युवराज्ञी सौ. श्रध्दाराजे भोंसले व संस्थेच्या इतर पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले. तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. अनुजा साळगांवकर, शिक्षक, शिक्षिकेतर कर्मचारी, पालक- शिक्षक संघ कार्यकाकरणी समितीचे पदाधिकारी व विदयार्थी यांनी देखील त्याचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.