व्हि. पी कॉलेजमध्ये रक्तदान शिबीरीला उत्स्फूर्त प्रतिसाद..!

Edited by: विनायक गावस
Published on: February 23, 2024 14:24 PM
views 116  views

सावंतवाडी : जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणीज यांच्या वतीने व्हि. पी कॉलेज ऑफ फार्मसी माडखोल येथे भव्य रक्तदान शिबीर संपन्न झाले. व्हि पी कॉलेज ऑफ फार्मसी माडखोल येथे आज जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणीज यांच्यावतीने आयोजित रक्तदान शिबीरीला गावातील ग्रामस्थ, महाविद्यालयातील विद्यार्थी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी व्यासपीठावर सांप्रदायाचे श्रीकांत बिरोडकर, वासुदेव कदम, स्वप्निल लातये, सुरज लातये, व्हि पी कॉलेजचे प्रशासकीय अधिकारी पंकज पाटील, माजी सरपंच संजय लाड तसेच डॉ.सौ ज्योती सुरवाडे ओरोस उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय सावंत यांनी केले.