व्हि. पी. कॉलेज माडखोलची पथनाट्य कार्यक्रमातून जनजागृती

Edited by: विनायक गावस
Published on: October 10, 2023 19:01 PM
views 69  views

सावंतवाडी : शनैश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित व्हि पी कॉलेज ऑफ फार्मसी, माडखोल च्या विद्यार्थ्यांनी जागतिक वर्ल्ड फार्मासिस्ट दिनानिमित्त सावंतवाडी शहरातील गांधी चौक व बाजारपेठेत पथनाट्य सादर करून जनजागृती केली. या पथनाट्यातून फार्मासिस्ट चे महत्व, अंधश्रद्धा निर्मूलन, प्रथमोपचार, औषध निर्मित्याचे महत्त्व लोकांसमोर पथनाट्यद्वारे सादर  करून जनजागृती केली. या पथनाट्यात डि. फार्म, बी.फार्म व एम.फार्म च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला तसेच सहाय्यक प्राध्यापिका दिप्ती फडते, वर्षा राणे, प्रणया चोडणकर उपस्थित होते.