
सावंतवाडी : वेत्ये येथे हाडांचा सांगाडा दिसूल आल्याची घटना मंगळवारी निदर्शनास आली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हा सांगाडा मानवी आहे की प्राण्याचा हे स्पष्ट झालेलं नाही.
पोलीस अधिक तपास करत असून आज दुपारपर्यंत याच निदान होणार आहे. ही हाडे ताब्यात घेऊन पुढील तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे. वेत्ये रोडवर असलेल्या एका धाब्या शेजारी हाडांच तुकडे दिसून आले. वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांनी घटनास्थळी येत पहाणी करून पोलिसांना घटनेची माहिती दिली.