ज्येष्ठ गायक उमेश मेस्त्री यांचं निधन

Edited by: विनायक गावस
Published on: July 12, 2023 20:42 PM
views 160  views

सावंतवाडी : ज्येष्ठ गायक उमेश दत्ताराम मेस्त्री यांचे काल मुंबई  ठाणे येथे त्यांचा  राहत्या  घरी  निधन  झाले.  त्यांनी  सुरूवातीला हार्मोनियम वादनाचे  शिक्षण  कै‌‌. रघुनाथ  उर्फ  बाबी  मेस्त्री यांच्याकडे  घेतले  व नंतर  मुंबईला  गेल्यावर  शास्त्रीय गायनाच रितसर  शिक्षण  पं.वसंतराव कुलकर्णी व नंतर  पं.बबनराव  हळदणकर  यांच्या कडुन  संपादन  केल.  त्यांनी  आपल्या  ठाणे  येथील  घरी  क्लासेस  सुरू  करून  अनेक  विद्यार्थ्यांना घडवलं. तसेच  सावंतवाडी  येथील  किरण  सिद्धये  यांच्या  अभिनव  संगीत  विदयालयात  शास्त्रीय  संगीताचे  विषेश  मार्गदर्शन  करण्यासाठी  ते  खास  मुंबईतून  येत  असत.   

त्याच्या  जाण्याने  आज संगीत क्षेत्रातील परीवारात  माेठी  पाेकळी  निर्माण  झाली  आहे. सावंतवाडीतील सद्गुरू संगीत विद्यालयाचे संचालक निलेश मेस्त्री यांचे ते चुलत बंधू होते.