न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा ठरले 'वेताळ करंडक २०२४'चे मानकरी

वेताळ प्रतिष्ठानच्यावतीने अश्वमेध तुळस महोत्सव संपन्न
Edited by: दिपेश परब
Published on: January 25, 2024 10:54 AM
views 61  views

वेंगुर्ले :  वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस आयोजित 'अश्वमेध महोत्सवांतर्गत' पूर्व प्राथमिक शाळा व इयत्ता पाचवी पासून पुढील शाळांसाठी विविध स्पर्धा सलग दहव्या वर्षी संपन्न झाल्या. शाळांसाठी समूहगीत गायन, एकेरी नृत्य, प्रश्नमंजुषा, समूहनृत्य, दशावतार साभिनय  स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या पाच स्पर्धामधून अव्वल ठरत मानाचा वेताळ करंडक न्यू इंग्लिश स्कूल, उभादांडा यांनी पटकावला. तर पूर्व प्राथमिक शाळांसाठी आयोजित केलेल्या समूहनृत्य स्पर्धेत एम.एम.परुळेकर प्राथमिक शाळा, मालवण  यांनी प्रथम क्रमांक पटकावत बाजी मारली.

         सदर शैक्षणिक महोत्सवाचे उद्घाटन शिवसेना राज्य संघटक गितेश विनायक राऊत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करून करण्यात आले, यावेळी व्यासपीठावर जिल्हा संघटक बाळा गावडे, माजी प.स. सभापती यशवंत परब, संदीप पेडणेकर, आबा सावंत, संजय गावडे, अजित राऊळ, नाना राऊळ, प्रतिष्ठानचे  अध्यक्ष विवेक तिरोडकर, सचिव.डॉ. सचिन परुळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

        प्रतिष्ठान अशा प्रकारचे शैक्षणिक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे याबद्दल समाधान व्यक्त करून गितेश विनायक राऊत

यांनी प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक केले. तर बाळा गावडे यांनी एकाच व्यासपीठावर अशा स्पर्धा आयोजित करणारी वेताळ प्रतिष्ठान ही एकमेव संस्था असून असे दर्जेदार व्यासीपीठ मुलांना उपलब्ध करून दिल्या बद्दल प्रतिष्ठानचे धन्यवाद व्यक्त केले. माजी प.स.सभापती यशवंत परब यांनी प्रतिष्ठान च्या संपूर्ण कार्याचा आढावा घेत संपूर्ण जिल्ह्यासाठी प्रतिष्ठान आदर्शवत आहे असे प्रतिपादन केले. या वेळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिष्ठान चे उपाध्यक्ष प्रदीप परुळकर यांनी सव्वीस वेळा रक्तदान आणि खजिनदार माधव तुळसकर यांनी एकोणतीस वेळा रक्तदान केल्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी पहिल्या अधिकृत महिला रिक्षाचालक हेमलता राऊळ आणि रक्तमित्र संघटक म्हणून उत्कृष्ट कार्य करणारे सर्पमित्र महेश राऊळ यांनाही मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल निवृत्त मुख्याध्यापक रमण किनळेकर यांचाही सत्कार करण्यात आला.

      या शैक्षणिक स्पर्धांचा निकाल खालील प्रमाणे: प्रशालासाठी समूहगीत गायन स्पर्धा प्रथम परशुराम मास्तर हायस्कूल, तेंडोली, द्वितीय नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च विद्यालय, नेमळे, तृतीय न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा, प्रशालासाठी समूहनृत्य स्पर्धा- प्रथम श्री. शिवाजी हायस्कूल, तुळस, द्वितीय न्यू इंग्लिश स्कूल, उभादांडा, तृतीय परबवाडा शाळा नं.१ वेंगुर्ले, प्रशालासाठी प्रश्न मंजुषा स्पर्धा- प्रथम श्री. शिवाजी हायस्कूल तुळस, द्वितीय नेमळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नेमळे, तृयीय न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा, प्रशालासाठी दशावतार साभिनय स्पर्धा- प्रथम वीर नारायण गावडे, द्वितीय ओमप्रकाश अनंत नाईक, प्रशालासाठी एकेरी नृत्य स्पर्धा- प्रथम वैष्णवी सौरभ मुणनकर (केळूस), द्वितीय दिशम ओंकार परब (श्री वेताळ  विद्यामंदिर तुळस), तृतीय काव्या प्रवीण गावडे (मिलाग्रिस हायस्कूल, सावंतवाडा), पूर्व प्राथमिक शाळासाठी समूहनृत्य स्पर्धा- प्रथम एम.एम.परुळेकर प्राथमिक प्राथमिक शाळा मालवण, द्वितीय श्री. वेताळ विद्यामंदिर तुळस, तृतीय जिल्हा परिषद शाळा मातोंड - गावठण, 

        वरील पाच स्पर्धेमध्ये सर्वोत्तम स्पर्धेमध्ये जी शाळा सर्वोत्तम सादरीकरण करते त्या शाळेसाठी मानाचा वेताळ करंडक दरवर्षी प्रदान केला जातो, सदर मानाचा वेताळ करंडक न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा यांनी पटकावित आपले या स्पर्धेतील मागील काही वर्षांतील असलेले वर्चस्व कायम राखले. या स्पर्धांना जिल्ह्यातील अनेक प्राथमिक व माध्यमिक प्रशालाचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला. विजेत्या सर्व स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस प्रदान करून गौरविण्यात आले.

       समूहगीत गायन स्पर्धेचे परिक्षण वैभव परब आणि मनिष तंबोसकर यांनी तर इतर सर्व स्पर्धांचे परिक्षण नृत्यांगना मृणाल सावंत आणि गीताली मातोंडकर यांनी केले. सूत्रसंचालन बी.टी. खडपकर यांनी तर आभार गुरुदास तिरोडकर यांनी मानले