
सावंतवाडी : शिक्षक परिषदेचे झुंजार नेते वेणूनाथकडू यांनी आपले सहकारी शिवाजीराव सागडे, व इतर कार्यकर्ते यांना सोबत घेत माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. मुश्ताक शेख यांची शनिवारी भेट घेतली .यावेळी त्यांनी शिक्षकांच्या विविध प्रश्न सोडविण्यासाठी डॉ. शेख यांना विनंतीही केली.
शिक्षकांचे रखडलेले प्रश्न, मुख्याध्यापकांच्या मान्यता, अनुकंप नियुक्ती, विविध प्रकारचे थकीत वेतन बिले, संच मान्यता अशा अनेकविध प्रश्नांना वाचा फोडून त्या तात्काळ निकाली काढण्याबाबत डॉ. शेख यांना shri. कडू यांनी साकडे घातले. यावेळी शिक्षक परिषदेचे कार्यकर्ते मुख्याध्यापक रघुनाथ घोगळे यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान डॉ. शेख यांनी वेणूनाथ कडू यांना लवकरात लवकर आपण केलेली विनंती मान्य करीत सर्व प्रश्न विश्वासाने सोडवू, असा आशावाद व्यक्त करत शिक्षकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आपण झटत आहात याबद्दल श्री. कडू यांचे अभिनंदनही केले.