
वेंगुर्ला : आनंदयात्री वाङ्मय मंडळासह अन्य सहयोगी संस्थांनी आयोजित केलेल्या वेंगुर्ला तालुका त्रैवार्षिक तिसरे मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर शहरातून काढण्यात आलेल्या ग्रंथदिडीचे उद्घाटन पद्मश्री पुरस्कार प्राप्त परशुराम गंगावणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवू झाले.
या संमेलनाच्या निमित्ताने गेले काही दिवस स्पर्धा आणि कार्यक्रम झाले. आज सायंकाळी बॅ.खर्डेकर महाविद्यालय ते संमेलन स्थळापर्यंत (साई मंगल कार्यालय) ग्रंथदिडी काढण्यात आली. या ग्रंथदिडीत मठ येथील रा.धों. खानोलकर हायस्कूलचे लेझीम पथक, बॅ.खर्डेकर महाविद्यालयाचे एनएसीसी कॅडेटस् तसेच संत परंपरा दाखविणारा चित्ररथ सहभागी झाले होते. यावेळी आनंदयात्री वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष वृंदा कबळी, प्रा.सचिन परुळकर, रविद्र परब, राजाराम नाईक, आत्माराम बागलकर, सुनिल नांदोसकर, शरद कांबळी, अजित वसंत राऊळ, महेश राऊळ, शैलेश जामदार, प्रसाद खानोलकर, रमण खानोलकर, प्राचार्य विलास देऊलकर, संजय पाटील, गुरुदास तिरोडकर, महेंद्र घाडी, डॉ.पूजा कर्पे, वृंदा गवंडळकर, चारुता दळवी, शिल्पा पाटील, महिमा घाडी, माधवी मातोंडकर, किरात ट्रस्टचे अॅड.शशांक मराठे, सीमा मराठे, ‘माझा वेंगुर्ला‘चे निलेश चेंदवणकर, यासीर मकानदार, कपिल पोकळे, अमृत काणेकर, डॉ.संजिव लिगवत यांच्यासह बहुसंख्य साहित्यप्रेमी उपस्थित होते.