
वेंगुर्ला : आज रविवार दिनांक २० ऑक्टोबर रोजी वेंगुर्ला पोलीस ठाणे हद्दीत उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांच्या उपस्थितीत व पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वेंगुर्ला शहरात शिरोडा नाका - लकी स्टोअर -चार गदा मारुती मंदिर - वेंगुर्ला बाजारपेठ - दाभोली नाका - व परत शिरोडा नाका असे पथ संचलन (रूट मार्च) करण्यात आले. सदर रूट मार्च करिता ६ पोलीस अधिकारी, ३२ पोलीस अंमलदार व सीआयएसएफ चे ३५ जवान हजर होते.