
वेंगुर्ले : कोकणसाद लाईव्हच्या १२ व्या वर्धापनदिनी सिंधुदुर्ग जिल्हापरिषदचे नवनिर्वाचित सदस्य तथा माजी आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ याना "स्मार्ट लीडर" पुरस्कार देऊन जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांच्या हस्ते तर प्रशासकीय निवृत्त पोलीस अधिकारी मोहन गवस, मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी सतीश पाटणकर, संपादक संचालक संजय ढवळीकर, संपादक संदीप देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.
समाजकार्यात सातत्य व जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडून त्या सोडवणे, आपल्या भागातील विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने सातत्याने प्रयत्नशील असणारा जनतेच्या मनातील नेता म्हणजेच प्रितेश शंकर राऊळ. सर्वसामान्य कुटुंबातून आपल्या राजकीय , सामाजिक कार्याची सुरुवात करत आज जनतेच्या मनातील आपला हक्काचा माणूस म्हणून प्रितेश राऊळ यांनी स्थान मिळवले आहे. राणे कुटुंबीयांचा अत्यंत विश्वासू, एकनिष्ठ शिलेदार म्हणून प्रितेश राऊळ यांची ओळख आहे. म्ह्णूनच अत्यंत तरूण वयात खासदार नारायण राणे यांनी त्यांच्यावर आरोग्य व शिक्षण सभापती पदाची जबाबदारी सोपवली होती. आणि ही जबाबदारी सांभाळताना त्यांनी जिल्ह्यावर ओढवलेल्या अनेक संकटांत ढाल बनून रक्षण केले. प्रतिकूल परिस्थितीत निष्ठेचा गड राखणाऱ्या प्रितेश राऊळ यांच्या रूपाने सिंधुदुर्गला एक 'व्हिजनरी' आणि विकासभिमुख चेहरा लाभला आहे. अशाच तरुण, तडफदार, विकासाचा ध्यास घेऊन वाटचाल करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सदस्य प्रितेश राऊळ यांना "स्मार्ट लीडर" म्हणून सन्मानित करण्यात आले.
यावेळी बोलताना श्री राऊळ म्हणाले, सिंधुदुर्ग लाईव्ह पासून आज कोकणसाद या प्रसात आपलं एक वेगळ नात या समूहाशी आहे. निर्भीड पत्रकारिता व तात्काळ घटनास्थळी पोचून बातमीच संकलन करणे ही कोकणसाद ची खासियत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, पर्यटन क्रांतीत कोकणसादचा मोलाचा वाटा आहे. पत्रकारिते सोबतच समाजीकतेचे भान ठेऊन विविध लोकाभिमुख उपक्रम या चॅनलने राबवले आहेत. असे गौरवोद्गार प्रितेश राऊळ यांनी यावेळी काढले.










