स्मार्ट लीडर पुरस्काराने सचिन देसाईंचा सन्मान

Edited by: दिपेश परब
Published on: March 02, 2026 14:24 PM
views 112  views

वेंगुर्ले : कोकणसाद लाईव्हच्या १२ व्या वर्धापनदिनी वेंगुर्ले पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य सचिन देसाई यांना "स्मार्ट लीडर" पुरस्कार देऊन आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते व संपादक संदीप देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मान करण्यात आला. 

काही समाजसेवकांच्या जीवनात संघर्षातून यश प्राप्ती असते असेच एक वेंगुर्ले तालुक्यातील उभरते नेतृत्व म्हणजेच पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य सचिन दामोदर देसाई. श्री देसाई यांनी आपल्या स्वकर्तृत्वावर तसेच समाजसेवेचे व्रत घेऊन जनतेसाठी काम करण्यास सुरुवात केली. कोरोना काळातील जनतेला विविध वैद्यकीय सुविधांसाठी मदत असेल किंवा त्यानंतर जनतेच्या सेवेप्रती विविध उपक्रम राबवून त्यांनी जनतेच्या मनात घर केले. आणि याचेच फलित म्हणून नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत सचिन देसाई यांना जनतेने लोकप्रतिनिधी म्हणून पसंती दिली. तसेच शिवसेना पक्षाच्या माध्यमातून संघटनात्मक बांधणी असेल किंवा पक्षवढीसाठी त्यांचे योगदान सुद्धा अधोरेखित आहे. अशाच या उभरत्या नेतृत्वाला कोकणसाद लाईव्ह कडून "स्मार्ट लीडर" पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.  

यावेळी कोकणसाद लाईव्हचे संपादक संचालक संजय ढवळीकर, मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी सतीश पाटणकर, भैरी भवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुल रावराणे, उद्योजक मोहन होडावडेकर, सामाजिक कार्यकर्ते ॲड. नकुल पार्सेकर आदी उपस्थित होते.