
वेंगुर्ले : होऊ घातलेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष ताकतीने निवडणुकीत उतरत आहेत. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज मंगळवारी वेंगुर्ले नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी नितीन कुबल यांचे नाव जाहीर केले. यांच्या सह नगरसेवक पदासाठी ही चार उमेदवारांची ही नावे जाहीर केली असून अन्य उमेदवारांची नावे लवकरच जाहीर करू असे सांगितले.
राष्ट्रवादी पक्षाची बैठक आज वेंगुर्ले येथे पार पडली. यावेळी हो घातलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकी संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष पदासाठी नितीन कुबल यांचे नाव जाहीर केले. तर नगरसेवक पदासाठी सौ. नम्रता कुबल, स्वप्नील रावळ, वामन कांबळे आणि अमित म्हापणकर हे उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. महाविकास आघाडी बाबत अध्याप चर्चा झालेली नसून पुढे चर्चा झाल्यास त्यावेळी पुढील निर्णय घेण्यात येईल असे माजी नगराध्यक्ष आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष सौ. नम्रता कुबल यांनी सांगितले.










