
वेंगुर्ले : वेंगुर्ले तालुक्यातील वरचीवाडी वेतोरे मधील निलेश गावडे यांच्या नेतृत्वात युवकांनी आज जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. या सर्वांना प्रवेश देत पक्षा मध्ये आपणा सर्वांचा योग्य सन्मान राखला जाईल असे श्री. दळवी यांनी सांगितले.
वेतोरे येथील गोगटे मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात निलेश गावडे यांच्या सोबत रोहन गावडे, अरुण गावडे, भूपेश गावडे, अथर्व गावडे, मुकुंद राऊळ, अरुण राऊळ, सचिन नाईक, सर्वेश नाईक, सचिन राऊळ, शरद कोचरेकर, संदीप गोगटे, आर्यन नाईक, ओमकार नाईक यांनी भाजप मध्ये प्रवेश केला. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्यासह भाजपा वेंगुर्ले तालुका अध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब, जिल्हा परिषद माजी सदस्य समिधा नाईक, सरपंच प्राची नाईक, मच्छीमार नेते वसंत तांडेल, दीपक नाईक, सुधीर गावडे, यशश्री नाईक, नितीन गावडे, शैलेश जामदार, विरोचन धुरी, यतीन आवळेगावकर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.










