
वेंगुर्ले : तालुक्यातील प्रसिद्ध व जागृत देवस्थान, मातोंड येथील स्वयंभू देवी सातेरीच्या जत्रोत्सवाला भाविकांनी सकाळपासून गर्दी केली आहे. देवी सातेरीच्या दर्शनासाठी सकाळपासून रांगा लावून भाविक दर्शन घेत आहेत. देवी सातेरीची ओटी भरणे, केळी ठेवणे हे कार्यक्रम सुरू आहेत.
रात्री सवाद्य तरंग देवता व उत्सव मूर्तीच मंदिरात आगमन झाल्यानंतर खऱ्या अर्थाने पुढील सालाबात कार्यक्रम सुरू होणार आहेत. रात्री १० नंतर संपूर्ण दिवसभर निर्जळी उपवास धरलेले भाविक देवीच्या मंदिराभोवती लोटांगण घालून आपला नवस फेडणार आहेत. यानंतर सवाद्य पालखी मिरवणूक होऊन स्थानील दशावतारी कलाकारांचा नाट्यप्रयोग संपन्न होणार आहे.










