वेंगुर्ला शहर शिवसेनेचा ३० रोजी कार्यकर्ता मेळावा

Edited by: दिपेश परब
Published on: October 28, 2025 19:07 PM
views 261  views

वेंगुर्ला : वेंगुर्ला शहर शिवसेनेचा ३० ऑक्टोबर रोजी कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. शहरातील स्वामिनी मंगल कार्यालयात सायंकाळी ६.३० ते ८ या वेळेत होणाऱ्या या कार्यकर्ता मेळाव्याला माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हाप्रमुख संजू परब, जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. आगामी होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा शहर कार्यकर्त्यांचा मेळावा अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. तरी या मेळाव्याला शहरातील शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यानी उपस्थित राहण्याचे आवाहन शहरप्रमुख उमेश येरम यांनी केले आहे.