
वेंगुर्ले : दरवर्षी प्रमाणे वारकरी पंढरपूर यात्रेसाठी शिरोडा गावातील तसेच वेंगुर्ला तालुक्यातील वारकरी रवाना झाले. त्यांना सिद्धेश(भाई) परब मंडळाच्या वतीने फळ वाटप करण्यात आले. गेल्या १३ वर्षापासून फळ वाटपाचा उपक्रम राबवण्यात येत आहे.
यावेळी पंचायत समिती माजी उपसभापती सिद्धेश(भाई) परब, शिरोडा उपसरपंच चंदन हाडकी, ग्रामपंचायत सदस्य प्रथमेश उर्फ बड्या परब, कृष्णा आचरेकर, वैभव मांजरेकर, समीर आचरेकर, गणेश गोडकर, गौरव राऊत, रुपेश परब, दत्तगुरु परब, अभय मठकर,अरुण शेट्ये,सोनू गावडे, रमाकांत परब,अच्युत मसूरकर, वारकरी बांधव तसेच इतर ग्रामस्थ उपस्थित होते.










