तुळस विकास सोसायटीच्या नूतन सभागृहाचं उदघाटन

Edited by: दिपेश परब
Published on: October 03, 2025 18:43 PM
views 38  views

वेंगुर्ला :  श्री देव जैतीर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी, तुळसच्या नुतन सभागृहाचे उद्घाटन तुळस सरपंच रश्मी परब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी तुळस येथील उद्योजक सुधीर झांटये, सोसायटी चेअरमन संतोष शेटकर, उबाठा शिवसेना वेंगुर्ला तालुका प्रमुख यशवंत परब, व्हाइस चेअरमन संजय परब, संचालक विजय रेडकर, गुंडू परब, विनय गोरे, सौ. भगत, सौ. आरावंदेकर, महादेव (बाबू) मेस्त्री, भुषण आरोसकर, ग्रामपंचायत सदस्य जयवंत तुळसकर, आपा परब, नाना राऊळ, बंड्या होडावडेकर, दादा गावडे, सुहास सावंत, संस्था सचिव सुशील परब आदी मान्यवर उपस्थित होते. 

संस्थेच्या नफ्यातून ८ लाख किमतीचे सुसज्ज असे सभागृह बांधण्यात आले असून, ग्रामसभा, बचतगट सभा, बचतगट महासंघ सभा, प्रशिक्षण यांना नाममात्र भाड्याने तर वाढदिवस, साखरपुडा किंवा इतर वैयक्तिक समारंभ यासाठी सुध्दा उपलब्ध वेळेनुसार हॉल भाड्याने देण्यात येणार असल्याचे संचालक मंडळाच्या वतीने ठरवण्यात आले. या उद्घाटनपर कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सुत्रसंचलन विजय रेडकर यांनी केले तर आभार सचिव सुशील परब यांनी मानले.