
वेंगुर्ला : वन्यजीव सप्ताह निमित्त वेंगुर्ले - मठ परिमंडळ मध्ये पेंडूर- सातवायंगणी वनक्षेत्रातून जाणाऱ्या रस्त्यांच्या दुतर्फा कोकम, आंबा, आवळा, खैर, फणस, बेल, ऐन, किंजल अश्या स्थानिक प्रजातींच्या ३०० रोपांची लागवड करण्यात आली.
दिनांक ०२ ऑक्टोबर रोजी सावंतवाडी उपवनसंरक्षक मिलिश दत्त शर्मा, सहाय्यक वनसंरक्षक डॉ. सुनील लाड, कुडाळ वनक्षेत्रपाल संदीप कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. तर या रोपांची लागवड सर्वोत्कर्ष एकता फाऊंडेशन, मातोंड यांच्या सहकार्याने करण्यात आली.
यावेळी मठ वनपाल सावळा कांबळे, तुळस वनरक्षक सागर भोजने, सर्वोत्कर्ष एकता फाऊंडेशन बाबाजी सावंत, सुरेंद्र परब, संजय परब, सोनू वेंगुर्लेकर, राजन चव्हाण, नितीन परब, प्रसाद नाईक, प्रशांत परब, सत्यवान तांडेल, विठ्ठल गवंडे आदींनी वृक्ष लागवड साठी उपस्थित राहुन श्रमदानाने वृक्ष लागवड केली.










