
वेंगुर्ले : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवड्याअंतर्गत आयुष्यमान आरोग्य मंदिर, तुळस येथे नमो नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी वेंगुर्ला भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष सुजाता पडवळ, तुळस सरपंच रश्मी परब, उपसरपंच सचिन नाईक, ग्रामपंचायत सदस्य जयवंत तुळसकर, बुथ अध्यक्ष पिंट्या राऊळ, बूथ अध्यक्ष प्रमोद गोळम, भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष वैभव होडावडेकर, रामचंद्र परब, आशा सेविका आदी मान्यवर उपस्थित होते.
नेत्र चिकित्सक डॉ. तेली, डॉ. गद्रे यांचे प्रतिनिधी उदय दाभोलकर आणि त्यांच्या चमू द्वारे तुळस गावातील एकूण ९८ जणांची नेत्र तपासणी करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार तुळस माजी सरपंच विजय रेडकर यांनी मानले.










