वायंगणीत सायबर गुन्ह्यांचे मार्गदर्शन

Edited by: दिपेश परब
Published on: September 27, 2025 18:24 PM
views 250  views

वेंगुर्ले : फेसबुक व इंटरनेटच्या माध्यमातून सायबर भामटे फसवणूक करीत असतात. फेसबुक व इंटरनेट या माध्यमांचा वापर करणाऱ्यांनी अशा गैरप्रकारांना बळी पडू नये यासाठी सखोल मार्गदर्शन बँक ऑफ इंडिया शाखा वेंगुर्लाच्या कृषी अधिकारी सौ. प्रिती कुबल-चव्हाण यांनी केले.

बँक ऑफ इंडिया शाखा वेंगुर्लाच्या वतीने वायंगणी ग्रामपंचायतीच्या सभागृहात सायबर सुरक्षा बाबत सर्तकता व जागरुकता अभियान अंतर्गत (दि. 23 सप्टेंबर रोजी) मार्गदर्शनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांत अधिकारी बँक ऑफ इंडियाच्या कृषी अधिकारी प्रिती चव्हाण, वायंगणी ग्रामपंचायत  सरपंच दत्ताराम उर्फ अवी दुतोंडकर, उपसरपंच रविंद्र धोंड, ग्रामपंचायत सदस्य विनू मठकर, महेश मुणनकर, अनंत केळजी, विद्या कांबळी, दिपाली नांदोसकर, सविता परब, विद्या गोवेकर, राखी धोंड, वायंगणी पोलिस पाटील स्वप्नाली मसुरकर यांचा समावेश होता.  यावेळी शेतकरी व  ग्रामस्थ उपस्थित बहुसंख्येने उपस्थित होते.