राज्यस्तरीय भजन स्पर्धेचे प्रभाकर सावंत यांच्या हस्ते होणार उदघाटन

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त तुळस इथं आयोजन
Edited by: दिपेश परब
Published on: September 19, 2025 14:06 PM
views 56  views

वेंगुर्ला : वैभव होडावडेकर मित्रमंडळ, भारतीय जनता पार्टी तुळस व भाजप युवा मोर्चा वेंगुर्ला आयोजित भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या राज्यस्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेचे आज भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते व भाजप पक्षाच्या विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सायंकाळी ६ वाजता शुभारंभ होणार आहे.  सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच या सर्वांत मोठ्या राज्यस्तरीय संगीत निमंत्रित भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व भजन रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.